Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारची सर्वात लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी दर महिन्याला 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत जुलै महिन्यापर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. ऑगस्ट महिन्याची प्रतीक्षा महिलांना आहे. या योजनेतून आतापर्यंत अनेक कुटुंबीयांना आर्थिक आधार मिळाला आहे. पण या योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता अजूनही महिलांच्या खात्यात न जमा झाल्यामुळे महिलांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. यावर आता राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार?
ऑगस्ट महिना संपून आठ दिवस पूर्ण झाले आहेत मात्र अजूनही महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचा हप्ता न मिळाल्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. दरम्यान या संदर्भात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी यावर बोलताना म्हटले आहे की, ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेची अंमलबजावणी कधीच खंडित होणार नाही. लाभार्थी महिलांनी काळजी करू नये थोड्याच दिवसात त्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. Ladki Bahin Yojana
हे पण वाचा| लाडक्या बहिणींना मिळणार नाही ऑगस्ट-सप्टेंबर हप्त्याचे ₹3,000, कारण काय? वाचा सविस्तर
लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारकडून महाडीबीटी द्वारे प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पाठवला जातो. साधारणपणे हा हप्ता महिन्याच्या सुरुवातीला जमा होतो पण काही वेळा तांत्रिक अडचणीमुळे किंवा इतर काही कारणामुळे थोडा उशीर होतो. दरम्यान ऑगस्ट महिना देण्यास उशीर झाल्यामुळे महिला चिंताग्रस्त आहेत. तर काही महिलांच्या मनात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता एकत्रित दिला जाणार का असा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे. सरकारने अजून याबाबत कोणतेही अधिकृत घोषणा केली नाही. मात्र सरकार पुढे काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मागील महिन्याचा अनुभव
या आधी देखील असे अनेक वेळा घडले होते की हफ्ता देण्यास उशीर झाला होता. जुलै महिन्यात हप्ता रक्षाबंधनाच्या आधी महिलांच्या खात्यात जमा केला होता. एप्रिल आणि मे महिन्याचे हप्ते मात्र महिनाअखेरीस महिलांच्या खात्यात जमा झाले होते. त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता उशिरा आला तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. जर अजून विलंब झाला तर सप्टेंबर आणि ऑक्टोबर अशा दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार देखील महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात.
लाभार्थी महिलांनी काय करावे?
- लाभार्थी महिलांनी आपल्या हप्त्याचे स्टेटस लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर तपासावे.
- तसेच शंका असल्यास 181 या हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधावा.
2 thoughts on “लाडकी बहिणी योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता या दिवशी मिळणार? आदिती तटकरे यांनी सांगितले स्पष्ट…”