सोन्याचा दर कोसळला, चांदी देखील पडली, नवीन दर काय आहेत हे जाणून घ्या

Gold Rate Today  | सणासुदीचे दिवस जवळ आले की प्रत्येकाच्या घरामध्ये एक चाहूल लागते सोने-चांदी खरेदी करावा का? परंतु जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता पुढे नवरात्र, दसरा, दिवाळी असे मोठे सण आलेले आहेत. अशाच वेळी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे त्यामुळे महिलांमध्ये आणि गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कालपर्यंत विक्रमी उंचांकी दराला पोहोचलेलं सोन आज एकाच दिवसात तब्बल सहाशे रुपयांनी स्वस्त झाल आहे. ८ सप्टेंबर रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर ऑक्टोबर डिलिव्हरी साठी सोन्याचा दर एक लाख 7 हजार एकशे बावीस रुपये प्रति दहा ग्रॅम वर आला. म्हणजे तीन दिवसात सोन्याने घसरण पकडली आहे. त्याचबरोबर डिसेंबर डिलिव्हरीचा सोना देखील 612 रुपयांनी घसरून एक लाख 8,176 रुपये प्रति दहा ग्रॅम वर आले. Gold Rate Today

फक्त सोनच नाही तर चांदीचे दर देखील घसरलेले आहेत काही दिवसांपूर्वी एक लाख 26 हजार तीनशे रुपयांपर्यंत पोहोचलेली चांदी आज 977 ने घसरून एक लाख 23 हजार 720 रुपये प्रति किलो वर आली. ज्या महिला चांदीच्या दागिन्यांची किंवा भांड्यांची खरेदी करतात त्यांच्यासाठी ही बातमी दिलासादायक आहे

बाजारातील बाजाराबरोबर प्रदेशातील बाजारातही सोन्या-चांदीची घसरन दिसली. अमेरिकन कॉमेक्सवर डिसेंबर डिलिव्हरी साठी सोन 0.68 टक्क्यांनी घसरून 3,628 डॉलर्स प्रति अंशवर आलं. जागतिक बाजारात स्टॉप गोल्ड ही 3,584 डॉलर्स प्रति अंशवर आल आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कमकुवत ट्रेंड आणि गुंतवणूकदारांच्या प्रॉफिट बुकिंगमुळे ही घसरण झाली असल्याचे तज्ञ सांगत आहेत.

दरम्यान, इंडियन बुलियन ज्वेलर असोसिएशन जाहीर केलेल्या नवीन ताज्या दरानुसार आज 999 शुद्धतेचा सोनं एक लाख 7312 रुपये प्रति दहा ग्रॅम वर पोहोचला आहे. शुक्रवारी हा दर एक लाख 6,338 रुपये होता. चांदीचा दर मात्र एक लाख 23 हजार 668 रुपये प्रति किलो वर पोहोचला.

सनासुदीच्या आधी ही आलेली घसरण म्हणजे महिलांसाठी एक मोठी खुशखबरच म्हणावी. कारण या काळात सोन्या चांदी खरेदी करणे शुभ मानला जातो. ग्रामीण भागात तर नवरात्र दिवाळीला सोन्याची खरेदी करण्याची परंपरा आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि जर कमी झालेले आहेत यामुळे तुम्ही ही संधी साधू शकता.

Leave a Comment

error: Content is protected !!