Ladki Bahin Yojana: राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वात लोकप्रिय योजना आहे. या योजनेची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. लाखो महिला दरमहा येणाऱ्या या आर्थिक मदतीवर घर खर्च भागवत आहेत. पण मागील दोन महिने म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे सणासुदीच्या काळात अनेक महिलांच्या खात्यात या योजनेचा लाभ जमा होऊ शकतो. या योजनेअंतर्गत जुलै महिन्यापर्यंत पैसे महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे अजूनही महिलांना मिळालेले नाहीत. दरम्यान महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होईल अशी माहिती दिली आहे.
दोन महिन्याचे 3,000 रुपये एकत्रित मिळण्याची शक्यता
या योजनेअंतर्गत जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधना आधी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. त्यानंतर पूर्ण ऑगस्ट महिना संपला मात्र तरी देखील महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले नाहीत. त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा होतील अशी अपेक्षा होती. मात्र सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा देखील संपला आहे मात्र अजूनही महिलांना लाभापासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे महिलांच्या खात्यात पैसे जमा न झाल्याने मोठा प्रश्न उभा राहिला आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन महिन्याचे पैसे एकत्रित तब्बल 3000 रुपये महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात. नवरात्रीपूर्वी हे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे पण वाचा| लाडकी बहिणी योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता या दिवशी मिळणार? आदिती तटकरे यांनी सांगितले स्पष्ट…
पडताळणी प्रक्रिया सुरू
या योजनेअंतर्गत तब्बल दोन कोटी 63 लाख महिलांनी नोंदणी केली होती. त्यानंतर या योजनेची पडताळणी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही महिलांचे अर्ज चुकीचे निघाले. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार तब्बल 26 लाख अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत. या छाननीमुळे पैसे वितरणात उशीर झाला असल्याचे समोर आले आहे. यामुळे आता पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे दोन कोटी 44 लाख महिलांपर्यंत आली आहे. ज्या महिलांनी या योजनेच्या निकषाचे पालन केले नाही त्यांना या योजनेतून अपात्र केले जात आहे.
या योजनेतील सर्वात मोठे आव्हान म्हणजे अनेक महिलांचे बँक खाते नसल्यामुळे त्यांचे पैसे घरातील पुरुष सदस्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या तांत्रिक कारणामुळे देखील महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास उशीर होत आहे. सणसुदीच्या काळात घर खर्च वाढतो मुलांच्या शाळा स्तनाची खरेदी घरातील जबाबदाऱ्या या सर्व गोष्टींसाठी आर्थिक मदतीचे महिला आतुरतेने वाट पाहत असतात. अजूनही सरकारकडून रक्कम कधी जमा होणार याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र दोन महिन्याचा एकत्रित लाभ मिळणार असल्याची शक्यता असल्यामुळे महिलांना पुढील दहा-पंधरा दिवसात हे पैसे मिळू शकतात.
लाडकी बहीण योजनेचा हेतू महिलांच्या हातात थेट आर्थिक लाभ पोहोचवणे, महिलांना आर्थिक दृष्ट्या प्रबळ बनवणे असा आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे हप्ता जमा होण्यास उशीर झाला असला तरी महिलांनी काळजी करू नये कारण ही योजना कधीही बंद पडणार नाही जरी पैसे देण्यास उशीर झाला तरी महिलांनी चिंता करू नये. जर नवरात्रीपूर्वी महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले तर महिलांना मोठा दिलासा मिळेल. मात्र सरकारने याबाबत अधिकृत घोषणा करेपर्यंत महिलांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. Ladki Bahin Yojana
1 thought on “नवरात्रीपूर्वी लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होऊ शकतात 3000 रुपये? जाणून घ्या नविन अपडेट..”