यावर्षी कसे राहणार कापसाचे दर? सीझन सुरू होण्याआधीच शेतकऱ्यांची चिंता वाढली; वाचा सविस्तर

Cotton Market Price: महाराष्ट्रसह संपूर्ण देशभरात कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. आपल्या भागात कापसाला पांढरं सोनं म्हणून देखील ओळखलं जातं. अनेक भागात कापूस या पिकावर शेतकरी अवलंबून आहेत. संपूर्ण वर्षभर कापूस पिकाचे उत्पन्न घेण्यासाठी शेतकरी दिवस रात्र मेहनत करतात. मात्र यंदा कापसाचा सिझन सुरू होण्याआधी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. केंद्र सरकारने कापसावरील 11 टक्के आयात शुल्क शून्य करण्यात आला आहे. हा आयात शुल्क 31 डिसेंबर 2025 पर्यंत राहणार आहे. थोडक्यात परदेशातून येणारा कापूस स्वस्त मिळणार आहे. या निर्णयामुळे कापड उद्योग आनंदी झाले असले तरी, शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशा पडणार आहे.

सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे व्यापारी वर्गाला फायदा होईल. व्यापाऱ्यांचा कल देशांतर्गत कापसाचे परदेशी कापूस खरेदी कडे मोठ्या प्रमाणात राहणार आहे. कारण व्यापाऱ्यांना स्वस्तात कापूस मिळाला तर त्यांच्या उत्पादनात नक्कीच वाढ होईल. पण यातून सगळ्यात मोठा तोटा होणार तो मात्र शेतकऱ्यांचा. कापसाला देशांतर्गत बाजारपेठेत उठाव न मिळाल्याने दर घसरतील. आधीच कापसाचे भाव हमीभावा इतकेच असतात, यंदा शेतकऱ्यांना बाजारात अपेक्षित दर मिळणं कठीण वाटत आहे.

या वर्षासाठी हमीभाव काय आहेत?

सरकारने 2025 साठी कापसाचे हमीभाव जाहीर केले आहेत. लांब धाग्याचा कापूस असल्यास 7710 ते 8,110 रुपये प्रतिक्विंटल कापसाला हमीभाव मिळणार आहे.

मात्र शेतकऱ्यांच्या कापसाला प्रत्यक्षात हा दर मिळेल का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण बाजारात मागणी कमी झाली तर व्यापारी कापसाला एवढा दर देण्यास तयार होणार नाहीत. अशावेळी शेतकऱ्यांना आपला माल CCI च्या खरेदी केंद्रावर विकावा लागेल.

हे पण वाचा| नवरात्रीपूर्वी लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होऊ शकतात 3000 रुपये? जाणून घ्या नविन अपडेट..

मागील पाच वर्षाचा दर

  • 2021 — 12,000 रुपये
  • 2022 — 8,020 रुपये
  • 2023 — 7,020 रुपये
  • 2024 — 7,521 रुपये
  • 2025 — 8,110 रुपये

2021 मध्ये कापसाला सर्वात चांगला दर मिळाला होता. पण त्यानंतर सातत्याने कापसाच्या दरात घसरण सुरूच आहे. यांना देखील दर वाढतील असे चिन्ह दिसत नाहीत.

कापूस उत्पादनात घट

यंदा राज्यात साधारणपणे तीन लाख हेक्टरवर कापसाची पेरणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल एक लाख हेक्टरने यामध्ये घट झाली आहे. शेतकरी दराबद्दल नाराज असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापसाकडे पाठ फिरवली आहे. या पिका ऐवजी सोयाबीन, मूग, हरभरा हे पीक घेतली तर जास्त फायदा मिळतो असे शेतकऱ्यांचे मत आहे. Cotton Market Price

कापसाचा हंगाम सुरू होण्याआधीच केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे बाजारात अनिश्चितता निर्माण झाली आहे. टेक्सटाईल उद्योगांना दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशा पडली आहे. पांढऱ्या सोन्याचं पीक घेऊन शेतकरी चांगलं जीवन जगेल अशी स्वप्न पाहत असतो. पण प्रत्यक्षात कापसाला चांगला दर न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरत नाही. कधी कापसाचे दर घसरणीमुळे तर कधी पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी रडवला जातो. यंदाचा कापसाचा हंगामही शेतकऱ्यांसाठी चिंता चा असणार हे मात्र नक्की.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!