Ladki Bahin Yojana Scheme: महाराष्ट्रातील लाखो महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ही योजना खरोखरच गोरगरीब महिलांच्या आयुष्यात बळ देणारे ठरत आहे. या योजनेतील लाभापासून महिला त्यांच घर खर्च भागवतात मुलांचे शिक्षण करतात. लाडक्या बहिणींना या योजनेतून मिळणारा दरमहा 1500 रुपयांचा लाभ खरंच त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी मोलाची भूमिका बजावत आहे. या योजनामुळे लाखो महिलांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत या योजनेतून जुलै महिन्यापर्यंत पैसे मिळाले आहेत. राज्यातील महिलांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या महिलांच्या मनात गेल्या काही दिवसापासून एकच प्रश्न घर करून बसला आहे. ऑगस्ट महिना संपून दहा दिवस झाले मात्र अजूनही ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला नसल्यामुळे हा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांची लक्ष लागले होते. गणेश उत्सवात पैसे मिळतील अशी अपेक्षा महिलांना होती पण ती पूर्ण न झाल्यामुळे सप्टेंबर महिना सुरू होऊन तब्बल दहा दिवस उलटले आहेत तरी महिलांना पैसे मिळाले नव्हते. त्यामुळे महिलांमध्ये नाराजी दिसत होती. मात्र आता समोर आलेल्या अपडेट मुळे महिलांना नक्कीच दिलासा मिळत आहे. राज्य सरकारने लाडक्या बहिणीच्या ऑगस्ट महिन्याचा हप्त्यासाठी तब्बल ३४४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून वितरित केला आहे. म्हणजेच आता लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये खटाखट जमा होणार आहेत.
राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मंगळवारी याबाबत अधिकृत शासन निर्णय जाहीर केला आहे. यामध्ये केवळ ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. सध्या प्रसार माध्यमांमध्ये लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये दिले जातील अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र महिलांना पुढील हप्त्याची प्रतीक्षा करावीच लागणार असा थेट निर्णय सरकारने घेतला आहे. सध्या फक्त ऑगस्ट महिन्याचा हप्ताच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. Ladki Bahin Yojana Scheme
हे पण वाचा| लाडकी बहिणी योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता या दिवशी मिळणार? आदिती तटकरे यांनी सांगितले स्पष्ट…
किती महिलांना मिळणार लाभ?
लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या राज्यातील तब्बल दोन कोटी 48 लाख महिलांना लाभ दिला जात आहे. जुलै महिन्यापर्यंत प्रत्येकाला 1500 रुपये मिळाले आहेत. ऑगस्ट महिन्याचा हप्ता पुढील काही दिवसात महिलांच्या खात्यात जमा होईल. या योजनेसाठी निधी मंजूर झाल्यामुळे कधीही सरकार अधिकृतपणे महाडीबीटी द्वारे महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये खटाखट जमा करू शकतात.
आदिती तटकरे यांचे आश्वासन
काही दिवसापूर्वी महिला व बालविकास मंत्री अतिथी तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना एक आश्वासन दिलं होतं की, ऑगस्ट महिन्याचा लाभ लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर महिलांमध्ये आत्मविश्वास वाढला होता आणि आता सरकारकडून निधी मंजूर झाल्यानंतर यात आणखीन वाढ झाली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी चालू आर्थिक वर्ष 2025 26 मध्ये सरकारकडून तब्बल 3960 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे या वर्षात महिलांना नियमितपणे हप्ते मिळतील असा विश्वास राज्य सरकारकडून दिला जात आहे.
राज्यातील लाखो महिला या पैशाची आतुरतेने वाट पाहत होत्या. काहींच्या संसारातले खरे अडथळे होते तर काही महिलांना मुलांच्या शाळेची फी भरायची होती अशावेळी सरकारचा हा निर्णय महिलांसाठी दिलासा देणारा ठरत आहे. सरकारने ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी 344 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून पुढील काही दिवसात हा निधी राज्यातील तब्बल 2.48 कोटी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. राज्यातील महिलांना सरकारची ही योजना खरंच दिलासा देणारे ठरत आहे. या योजनेच्या हप्त्याला जरी उशीर होत असला तरी सरकारने उशिरा का होईना या योजनेचा लाभ द्यावा अशी अपेक्षा महिलांची आहे.
2 thoughts on “खुशखबर! ऑगस्ट महिन्याचे ₹1500 खात्यात खटाखट येणार, सरकारने घेतला मोठा निर्णय”