DA Hike: आपल्या भारतामध्ये दिवाळीचा सण सर्वात मोठा मानला जातो. भारतातील प्रत्येक घरामध्ये मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जातो. या दिवाळीनिमित्त केंद्र सरकारकडून लाखो कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्त पेन्शन धारकांसाठी दिवाळीपूर्वी महागाई भत्त्यात वाढ होणार असल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे पगार आणि पेन्शन मध्ये थेट वाढ होऊन कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता म्हणजेच DA (dearness allowance) वर्षातून दोनदा वाढ म्हणून दिला जातो. जानेवारी ते जून आणि जून ते डिसेंबर या दोन टप्प्यांमध्ये हा महागाई भत्ता दिला जातो. सध्या कर्मचाऱ्यांना 55% महागाई भत्ता दिला जात आहे. परंतु आता यामध्ये तीन टक्क्याची वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच नवीन DA 58% होऊ शकतो.
किती वाढणार पगार आणि पेन्शन?
महागाई भत्ता नेहमी बेसिक सॅलरीवर दिला जात असतो. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याला किंवा पेन्शनधारकांना त्याच्या बेसिक सॅलरीयानुसार वेगळा आकडा तयार होऊ शकतो. DA Hike
खुशखबर! ऑगस्ट महिन्याचे ₹1500 खात्यात खटाखट येणार, सरकारने घेतला मोठा निर्णय
पेन्शनधारकांसाठी मिळणार हा फायदा
जर एखादा निवृत्त कर्मचाऱ्याला नऊ हजार रुपये पेन्शन मिळत असेल तर सध्या त्याला 55% महागाई भत्त त्यामुळे 4950 रुपये मिळतात. म्हणजेच एकूण पेन्शन 13950 रुपये मिळते. आता DA वाढवून 58% झाल्यास हा भत्ता 5220 रुपये एवढा होईल. अशावेळी एकूण पेन्शन 14 हजार 220 रुपये एवढी होईल.
नोकरदार कर्मचाऱ्यांसाठी फायदा
जर एखाद्या कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी 18 हजार रुपये असेल तर सध्या त्याला 55% महागाई भत्ता म्हणजेच 9900 मिळत आहेत. त्यामुळे एकूण पगार 27 हजार 900 रुपये मिळेल. आता हा भत्ता 58% वाढला तर DA 10,440 रुपये मिळेल. त्यामुळे त्याचा आता एकूण पगार 28 हजार 440 रुपये एवढा होईल.
वाढत्या महागाईमुळे घर खर्च मुलांचे शिक्षण बाजारातील वस्तूचे भाव या या सगळ्या गोष्टीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे कुटुंबावर ताण येत आहे. त्यामुळे महागाई भत्त्यात होणारी ही वाढ कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी दिलासा देणारी ठरणार आहे. या वाढीमुळे दिवाळीच्या खरेदीला मोठा उत्साह निर्माण होईल. सरकारकडून सध्या आठवावेतन आयोग लागू करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. पण त्याआधीच सातवे वेतन आयोगानुसार शेवटचा महागाई भत्ता वाढवून कर्मचाऱ्यांना याचा फायदा दिला जाण्याची शक्यता आहे. यामुळे दिवाळीचा आनंद चांगलाच वाढणार आहे.