Meteorological Department warning : पुन्हा एकदा हवामान खात्याने मोठा इशारा दिलेला आहे आणि लोकांच्या मनामध्ये एक भीतीच वातावरण निर्माण झालेल आहे. देशामध्ये अनेक राज्यात अधिक पावसाच्या तडाख्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना सावधान राहण्याची गरज आहे. पंजाब हिमाचलमध्ये पूरी परिस्थितीमध्ये मोठे नुकसान झालं होतं. अशावेळी आता हवामान खात्याने पुन्हा एकदा सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्यात ला निना प्रणाली सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. म्हणजेच पुन्हा एकदा वातावरणात मोठा बदल होण्याची भीती वर्तवली जात आहे. खर तर हा ला नीना शब्द लोकांना फारसं माहित नाही पण हवामान तज्ञांच्या भाषेत सांगायचं झाले तर या घटनेमुळे काही काळ वातावरण थंडसर होतं, हवेतील दाटी वाढते आणि पावसाच्या पद्धतीमध्ये बदल होतो. Meteorological Department warning
हवामान खात्याच्या अपडेट नुसार, सप्टेंबरच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला ही परिस्थिती निर्माण होऊ शकते. पण एक दिलासा द्यायचा झाल्यास, यंदा नैऋत्य मौसमी वारे परत फिरण्याची शक्यता पुढील दोन-तीन आठवड्यामध्ये सुरू होणार असल्याने ला निना, चा महाराष्ट्रावरती फारसा परिणाम होणार नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे. म्हणजे राज्यात भीती करण्यासारखं कारण नाही, तरीही शेतकरी, नागरिक आणि खेड्यापाड्यातील लोकांना या नव्या इशाराने चिंता पडली आहे. कारण गेल्या काही वर्षापासून एल निनो ला निना च्या नावाखाली पावसात मोरे चढउतार होताना आपण बघत होतो.
एल निनो आणि ला नीना हे दोन हवामानाचे खेळाडू आहेत, जे काही वर्षांनी डोकं वर गाळतात आणि संपूर्ण जगाचा हवामान बदलून टाकतात. एल निनो असताना प्रशांत महासागराच्या मध्य व आग्नेय भागातलं पाणी तापत, वारे कमजोर होतात आणि पावसाचं प्रमाण बिघडतं. तर उलट ला निनो असताना महासागराच्या पूर्वेकडील भागातलं पाणी थंड सर होतं. हवा दाट होते आणि कधी कधी सरासरीपेक्षा जास्त पाऊसही होतो. म्हणजेच दोन्ही स्थितींनी वातावरणाची ताळमेळ ढासळतो.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, ला मीनाची स्थिती निर्माण झाली तरी महाराष्ट्रात त्याचा जास्त फटका बसणार नाही. पण जर ही परिस्थिती हिवाळ्यात निर्माण झाली असली तरी थंडी अधिक तीव्र झाली असती. ग्रामीण भागातील लोकांना मात्र एवढा प्रश्न आहे की आधीच पावसाने मार खाल्लेला शेतकरी आणखी कसला बळी होणार? विभागात पिक उध्वस्त झाली, काही ठिकाणी अजूनही पूर पाणी वसरण्याचं नाव घेत नाही आणि अशातच पुन्हा एकदा हवामान खात्याचा हा अंदाज नागरिकांना विचलित करून टाकणार आहे.
हवामान खात्याने दिलेला या माहितीनुसार राज्यातील वातावरण यापुढे कसे राहते हे पाहण्यासारखे राहणार आहे परंतु या पार्श्वभूमी वरती शेतकऱ्याने आणि नागरिकांनी सावध भूमिका घ्यावी हे देखील महत्त्वाचे.