दहावीच्या परीक्षेची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू; या ठिकाणाहून करा अर्ज विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना

10th Exam 2026 : फेब्रुवारी मार्च 2026 मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील लाखो विद्यार्थी, पालक आणि शाळा यांच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. कारण सोमवार, म्हणजे 15 सप्टेंबर पासून दहावीच्या परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. त्यामुळे दहावी देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी थोड्या सबुरीने घ्यायचा आहे. ताणतणावाच वातावरण आहे कारण अर्ज वेळेत भरणे हे त्यांच्यासाठी महत्त्वाच आहे. 10th Exam 2026

राज्य मंडळांनी दिलेल्या माहितीनुसार, नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज युडायस प्लस मधील पेन आयडीवरून त्यांच्या शाळेमार्फत ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येणार आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतंत्रपणे काही करायचं नाही, तर शाळा प्रमुखांनीच ही संपूर्ण प्रक्रिया हाताळायची आहे. मात्र त्याचबरोबर पुणपरीक्षार्थी, खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजना घेणारे, विषय निवडलेले किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणारे असे विद्यार्थी मात्र मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून www.mahahsscboard.in या माध्यमातून आपल्या अर्ज भरू शकता.

या प्रक्रियेचा कालावधी ठरावविण्यात आला असून, 15 सप्टेंबर पासून 6 सप्टेंबर पर्यंत अर्ज भरता येतील. मात्र, शाळांनी अर्ज भरण्याआधी आपला शाळेचा प्रोफाइल व्यवस्थित पूर्ण करणे आवश्यक आहे. म्हणजे शाळा, संस्था, मान्यताप्राप्त विषय, शिक्षकांची माहिती अचूक भरून मंडळाकडे पाठवावी लागेल. अर्ज भरल्यानंतर Pre list शाळांच्या लॉगिन मध्ये उपलब्ध होईल, त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांमार्फत पडताळणी करून ती माहिती जनरल रजिस्टर नुसार अचूक आहे का हे तपासण्यात येणार आहे. प्रत्येक पानावर शाळेचा शिक्का आणि मुख्याध्यापकांची स्वाक्षरी असणे बंधनकारक आहे.

यामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे परीक्षा शुल्क. हे शुल्क शाळांनी आरटीजीएसद्वारे भरावे लागणार आहे. शुल्काची पावती, चलन आणि विद्यार्थ्यांच्या याद्या प्रि लिस्टसह चमक कारण्याबाबतचा कालावधीनंतर कळवण्यात येणार आहे. म्हणजे सध्या विद्यार्थ्यांना आणि बालकांना सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे शाळांशी संपर्क ठेवून अर्ज प्रक्रिया योग्य प्रकारे योग्यरीत्या पूर्ण होईल याची खात्री करून गेली.

दरवर्षी दहावीची परीक्षा म्हणजे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा टप्पा असतो आणि याच टप्प्याच्या माध्यमातून त्यांचा भविष्य घडत असतं. त्यामुळे अनेक पालक अर्जाची प्रक्रिया बाबत गोंधळलेले आहेत. त्यामुळे शाळा प्रशासनाकडून स्पष्ट मार्गदर्शन मिळणे हे महत्त्वाचं आहे. एकदा अर्ज नीट भरला की पुढचं पाऊल म्हणजे अभ्यासाला पूर्णपणे झोकून देणं.

फेब्रुवारी मार्च 2026 मध्ये होणारी ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आवश्यक एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी ही परीक्षा खूप महत्त्वाची ठरते. त्यामुळे आता पुढील काही दिवस विद्यार्थी आणि पालकांसाठी तणावपूर्ण असेल तरीही हा अर्ज भरण्याचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला की, तायडीला योग्य दिशा मिळेल यात शंका नाही.

Leave a Comment

error: Content is protected !!