पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता दिवाळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार? जाणून घ्या नवीन अपडेट

PM Kisan Samman Nidhi Yojana: केंद्र सरकार अंतर्गत शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची योजना राबवली जाते. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभी राहत आहे. या योजनेच्या चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणारी ही योजना खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी सहा हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करते. ही रक्कम प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यामध्ये जमा केली जाते. आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हप्ते जमा करण्यात आले आहे. त्यामुळे आता शेतकरी मित्र 21 हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे.

प्रत्येक गावागावांमध्ये शेतकरी बांधवांमध्ये एकच चर्चा सुरू आहे. यांना दिवाळी आधी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हप्ता मिळणार का? कारण सण उत्सवाच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हातभार लागला तर खर्च भागवायला सोपं होतं. परंतु सरकारकडून अजून 21 व्या त्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. गेल्या वर्षीच्या वेळापत्रकानुसार प्रत्येक हप्ता साधारण चार महिन्याच्या अंतराने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. नुकताच विसावा हप्ता २ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे. त्यामुळे यंदा दिवाळीच्या तोंडावर एक विश्वा हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे पण वाचा| खुशखबर! लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचे ₹1500 जमा; तुमच्या खात्यात जमा झाले का नाही?

तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्याच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो. मात्र हा केवळ अंदाज असून अधिकृत तारीख अजून जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही अफेवर विश्वास न ठेवता अधिकृत घोषणेची वाट पाहावी. ही योजना सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळत आहे. या रकमेचा वापर शेतकरी बियाणे खरेदी करण्यासाठी खत खरेदी करण्यासाठी मजुरांचे पैसे देण्यासाठी घर खर्च भागवण्यासाठी करतात.

सध्या खरीप हंगाम सुरू आहे. पुढे दिवाळीचा सण आहे त्यानंतर रब्बीची तयारी या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना एक विषय हप्त्याचे दोन हजार रुपये मिळाल्यानंतर नक्कीच आर्थिक हातभार लागेल. दिवाळीपूर्वी पी एम किसान योजनेचा हप्ता मिळण्याची शक्यता कमी असली तरी दिवाळीनंतर शेतकऱ्यांना 21वा हप्ता जाहीर होऊ शकतो. पुढील काही दिवसात केंद्र सरकारकडून याबाबत अधिकृत घोषणा होईल अशी अपेक्षा आहेत. PM Kisan Samman Nidhi Yojana

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

2 thoughts on “पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता दिवाळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार? जाणून घ्या नवीन अपडेट”

Leave a Comment

error: Content is protected !!