लाडक्या बहीणींसाठी महत्वाची बातमी! दरमहा ₹1500 मिळवण्यासाठी आता करावं लागणार ‘हे’ काम, अन्यथा…

Ladki Bahin Yojana E-KYC: लाडक्या बहीणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील लाखो महिलांना दरमहा आर्थिक मदत मिळत आहे. अनेक गोरगरीब कुटुंबाचा घर खर्च भागवण्याचे काम लाडकी बहीण योजनेच्या पैशातून झाले आहे. काही महिलांनी या योजनेच्या लाभातून आपल्या मुलांची फीस भरली आहे. मात्र आता या योजनेबाबत सरकारकडून एक नवीन अट घालवण्यात आली आहे. ही अट पूर्ण न केल्यास पुढील काळात लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणे थांबू शकते.

तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असाल तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत x वर ट्विट करून माहिती दिली आहे की, लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या सर्व महिलांना e–kyc करणे बंधनकारक आहे. सरकारने केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी https://ladkibahin.maharashtra.gov.in पोर्टल उपलब्ध करून दिले आहे. या पोर्टलवर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकता.

हे पण वाचा| महिलांसाठी पोस्ट ऑफिसच्या या 4 भन्नाट योजना देत आहेत जबरदस्त परतावा! जाणून घ्या सविस्तर

किती तारखेपर्यंत करावी लागणार E–KYC?

मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व महिलांना आजपासून पुढील दोन महिन्यात ही सर्व प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. केवायसी करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी असून तुम्ही घरबसल्या मोबाईलवर किंवा संगणक वर सहजपणे करू शकता. सरकारने दिलेल्या कालावधीमध्ये तुम्ही केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास तुमचा लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला मिळणारा 1500 रुपयांचा लाभ कायमस्वरूपी बंद होऊ शकतो. Ladki Bahin Yojana E-KYC

सरकारचं म्हणणं आहे की, e-kyc केल्यामुळे योजनेत पारदर्शकता निर्माण होईल आणि योग्य लाभार्थ्यांपर्यंत या योजनेचा फायदा पोहोचेल. ज्या महिला खरंच या योजनेसाठी पात्र आहेत त्या महिलांना आर्थिक मदत मिळेल. मागील काही काळामध्ये या योजनेत अनेक गैरप्रकार घडल्याचे समोर आल्यामुळे सरकारने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. याशिवाय भविष्यात इतर शासकीय योजनेचा लाभ मिळवण्यासाठी देखील ही प्रक्रिया उपयोगी ठरू शकते.

E-kyc न केल्यास काय होईल?

सरकारच्या म्हणण्यानुसार प्रत्येक वर्षी जून पासून दोन महिन्याच्या कालावधीत e-kyc प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. शासन निर्णयानुसार जर एखाद्या लाभार्थी महिलांनी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण केली नाही तर पुढील महिन्यापासून तिचे नाव या योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळले जाऊ शकते. म्हणजेच त्या लाडक्या बहिणींचा लाभ कायमचा बंद होऊ शकतो. सरकारने याबाबत स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. वेळेत ई–केवायसी न करणाऱ्या लाभार्थ्यांना पुढील होणाऱ्या कारवाईस सामोरे जावे लागणार आहे.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभापासून अनेक महिलांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत मिळाली आहे. या योजनेला अवघ्या काही वेळातच खूप लोकप्रियता मिळाली आहे. या योजनेतून मिळालेल्या लाभापासून अनेक महिलांनी आपला छोटासा व्यवसाय देखील सुरू केला आहे. आशा या योजना खऱ्या अर्थाने महिलांना दिलासा देणाऱ्या ठरत आहेत. मात्र सरकारच्या म्हणण्यानुसार या योजनेचा लाभ योग्य महिलांपर्यंत जाणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकारने ई–केवायसी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे भगिनींनी थोडा वेळ काढून ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी अन्यथा तुमचा लाभ थांबू शकतो.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

2 thoughts on “लाडक्या बहीणींसाठी महत्वाची बातमी! दरमहा ₹1500 मिळवण्यासाठी आता करावं लागणार ‘हे’ काम, अन्यथा…”

Leave a Comment

error: Content is protected !!