Railway Recruitment 2025: प्रत्येक जणांचं सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असतं. तुम्हाला देखील सरकारी नोकरी करण्याची असेल तर रेल्वे मधील ही मेगा भरती तुम्हाला नोकरी करण्याची संधी देत आहे. आजकाल लाखो तरुण रेल्वेत नोकरी करण्यासाठी वर्षानु वर्ष तयारी करत आहेत. कोणाला लोको पायलट व्हायचं असतं तर पुणे स्टेशन मास्टर तर कोणी अप्रेंटिस बनवून रेल्वेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असतात. रेल्वेत नोकरी लागणे म्हणजे तुमचं भविष्य सुरक्षित आणि चांगला पगार मिळणे निश्चित आहे.
रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छित असणाऱ्या लाखो तरणांसाठी भारतीय रेल्वे कडून मोठी बातमी समोर येत आहे. रेल्वे रिक्रुटमेंट सेल (RRC) मध्ये तब्बल 1763 अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या भरतीत कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. म्हणजेच ज्यांना बिना अभ्यास करता थेट कामावर शिक्षणाची आणि स्थिर नोकरी मिळवण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.
भरती बाबत महत्त्वाची माहिती
- एकूण पदाची संख्या: 1763
- पदाचे नाव: अप्रेंटिस (Apprentice)
- वय मर्यादा: 15 ते 24 वर्ष
- शैक्षणिक पात्रता: किमान दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मधील आयटीआय सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया कशी होणार?
- कुठलीही लेखी परीक्षा होणार नाही.
- अर्ज तपासणी + मेरिट लिस्ट
- कागदपत्र पडताळणी
- ट्रेनिंग साठी निवड
हे पण वाचा| आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ; 24, 22 अन् 18 कॅरेटचे भाव किती? वाचा सविस्तर
अर्ज कधीपासून सुरू होणार?
रेल्वे भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 18 सप्टेंबर 2025 पासून सुरू झालेली आहे. इच्छुक उमेदवारांनी 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज दाखल करायचा आहे. म्हणजेच अजून जवळपास एक महिना अर्ज करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता त्वरित जवळील ऑनलाईन सेंटर मध्ये जाऊन आपला अर्ज करायचा आहे. Railway Recruitment 2025
अर्ज कसा करावा?
रेल्वे भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.
- सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर जा. https://examerp.com/registration/s_login_new .aspx
- New registration या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचं नाव आधार क्रमांक मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक भरा.
- रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर लॉगिन करून संपूर्ण माहिती भरा.
- सर्व माहिती भरल्यानंतर पासपोर्ट साईज फोटो सही आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- त्यानंतर अर्ज शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा.
आजकाल सरकारी नोकरीसाठी स्पर्धा वाढत चालली आहे. लाखो तरुण दिवस रात्र सरकारी नोकरीसाठी अभ्यास करून आपली निवड होण्याची वाट पाहत आहे. रेल्वेचे नाव आलं की स्पर्धा अजूनही कठीण होते. अशावेळी कोणत्याही परीक्षा शिवाय फक्त शैक्षणिक पात्रच्या आधारे नोकरी मिळवण्याची ही संधी खूप फायद्याची ठरू शकते. रेल्वेत अप्रेंटिस म्हणून प्रवेश घेतल्यानंतर उमेदवारांना प्रत्यक्ष ट्रेनिंग दिली जाईल. काम शिकतानाच अनुभव मिळतो आणि पुढे स्थायी नोकरीसाठी ही मदत होते. त्यामुळे ग्रामीण भागातील आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बळ उमेदवारांसाठी ही भरती म्हणजे सुवर्णसंधी ठरते आहे.
अर्ज कोण करू शकतो?
त्या विद्यार्थ्यांनी दहावी उत्तीर्ण केली आहे आणि संबंधित आयटीआय ट्रेड चे प्रमाणपत्र घेतले आहे ते उमेदवार ही नोकरी करण्यासाठी पात्र आहेत. वय 15 वर्षापासून ते 24 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे. एससी, एसटी, ओबीसी आणि दिव्यांग उमेदवारांना सरकारच्या नियमानुसार वयोमर्यादा मध्ये सवलत दिले जाणार आहे.

Muje ye nokri mere priwar ke liye chahiye