नवरात्रनिमित्त महिलांसाठी मोठी भेट! मोदी सरकारकडून 25 लाख मोफत एलपीजी कनेक्शन दिले जाणार

Ujjwala New Gas Connection: नवरात्राचा पवित्र उत्साह सुरू होताच मोदी सरकारकडून देशातील लाखो महिलांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत तब्बल 25 लाख नवीन मोफत एलपीजी कनेक्शन दिले जाणार आहेत. केंद्र सरकारच्या या उपक्रमामुळे एकूण उज्वला लाभार्थ्यांची संख्या 106 दशलक्ष इतकी होणार आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंह यांनी याबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले आहे की, प्रत्येक नवीन कनेक्शन वर सरकार 2050 रुपये खर्च करणारा असून यामध्ये मोफत गॅस सिलेंडर, गॅस स्टोव्ह, रेग्युलेटर आणि इतर उपकरणे लाभार्थ्यांना दिली जाणार आहेत.

यानंतर पुरी यांनी सोशल मीडियावर म्हंटलं आहे की, नवरात्रीच्या शुभप्रसंगी उज्वलाचा विस्तार हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा महिलांना सन्मान आणि सक्षमीकरण देण्याचा दृढ संकल्प आहे. अनेकांच्या मते ही योजना केवळ स्वयंपाकाचा त्रास कमी करणारी नसून आरोग्य सन्मान आणि पर्यावरण या तिन्ही गोष्टींना प्रोत्साहन देणारी आहे. आज उज्वला योजनेअंतर्गत नोंदणीकृत कुटुंबांना सरकारकडून तीनशे रुपयांचे अनुदान दिले जाते. त्यामुळे गॅस सिलेंडर फक्त 553 रुपयाला पडतो. गॅस सिलेंडरची ही किंमत जगातील अनेक देशाच्या तुलनेत खूप कमी आहे.

कोणाला मिळणार मोफत गॅस कनेक्शनचा लाभ?

  • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा गरीब कुटुंबातील प्रौढ महिला
  • ज्यांच्या घरी सध्या एलपीजी गॅस कनेक्शन नाही.
  • अर्जदाराकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
  • बँक खाते तपशील
  • पासपोर्ट साईज फोटो

अर्ज कसा करावा?

मोफत गॅस कनेक्शन मिळवण्यासाठी महिलांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर जा ज्याची लिंक वरती दिली आहे.
  • तेल कंपनी निवडा इंडेन/भारत गॅस/एचपी गॅस
  • उज्वला 2.0 नवीन कनेक्शन हा पर्याय निवडा.
  • राज्य जिल्हा आणि वितरक निवडा.
  • मोबाईल नंबर टाकून ओटीपी व्हेरिफिकेशन पूर्ण करा.
  • तुमची वैयक्तिक माहिती, पत्ता आणि बँकेची माहिती भरा.
  • ग्रामीण आणि शहरी सिलेंडरचा प्रकार निवडा.
  • घोषणा मान्य करून सबमिट बटणावर क्लिक करा.

अर्ज सबमिट केल्यानंतर मिळालेला संदर्भ क्रमांक जवळच्या गॅस एजन्सी मध्ये जमा करावा लागेल. त्यानंतर तुमचं नवीन कनेक्शन सुरू केल्या जाईल. Ujjwala New Gas Connection

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीचे स्वागत केले जाते. आशात मोदी सरकारकडून महिलांसाठी मिळालेली ही भेट खऱ्या अर्थाने घरातील लक्ष्मीला दिलेला सन्मानच आहे. धुरकट चुलीच्या त्रासातून सुटका करून महिलांना स्वच्छ गॅस सुविधा मिळवून देणे म्हणजे फक्त घराचा नव्हे तर देशाच्या आरोग्याचा विकास आहे. आतापर्यंत ज्या लाखो महिलांनी चुलीचा धूर सहन केला आता त्यांना उज्वलाच्या माध्यमातून नवीन विश्वास मिळत आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “नवरात्रनिमित्त महिलांसाठी मोठी भेट! मोदी सरकारकडून 25 लाख मोफत एलपीजी कनेक्शन दिले जाणार”

Leave a Comment

error: Content is protected !!