Weather Update: महाराष्ट्रात यंदाच्या मान्सून सुरुवातीपासूनच शेतकरी राजासमोर संकट उभ केली आहेत. साधारणपणे सात जून च्या आसपास राज्यात मान्सून दाखल होत असतो. मात्र यंदा तब्बल 26 मे रोजी राज्यात पावसाचा जोरदार तडाका सुरू झाला. सुरुवातीपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावत शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान केले. मध्ये काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा दोन-तीन आठवड्यापासून मुसळधार पावसामुळे राज्यभर हाहाकार माजला आहे. गावोगावी शेतातील पीक वाहून गेले आहेत. अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरला आहे रस्ते नाले सर्व तुडुंब भरून वाहत आहेत. शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेले पीक पावसाने वाहून गेले आहे. काही ठिकाणी शेत चिखलात गेला आहे. तर काही ठिकाणी जनावरे वाहून गेली आहेत. आशा पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने नवीन अंदाजात सर्वांची चिंता आणखीन वाढवली आहे.
मान्सून परतीचा प्रवास सुरू
कॉमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 15 सप्टेंबर पासून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. पुढील 12 ते 15 ऑक्टोबर दरम्यान तो देशातून पूर्णपणे निघून जाईल. असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र हा परतीचा प्रवास नेहमीप्रमाणे शांत होणार नसून याउलट जास्तीत जास्त पाऊस पुन्हा एकदा राज्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 24 ते 27 सप्टेंबर दरम्यान देशातील अनेक राज्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने ओडिसा आंध्र प्रदेश झारखंड महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Weather Update
हे पण वाचा| ‘या’ शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता मिळणार नाही! सरकारचा मोठा निर्णय
महाराष्ट्रात कसा असणार पाऊस?
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात पावसाचा जोर काही दिवस कायम राहणार आहे. यंदा सर्वाधिक फटका मराठवाड्याला बसला असून, या भागातील सोयाबीन कापूस तूर ज्वारी यासारख्या प्रमुख पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशात हवामान विभागाने पुढील तीन-चार दिवस मराठवाड्यात प्रचंड पावसाची शक्यता वर्तवली असल्यामुळे येथे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठच्या लोकांनी सावध राहून पाण्याचा प्रवाह येण्यापूर्वी सुरक्षित ठिकाणी जावे असे आवाहन करण्यात आले आहे.
विदर्भात ढगाळ वातावरण राहील अनेक जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसणार आहे. तर काही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. कोकण पश्चिम महाराष्ट्रात अधून मधून पावसाच्या सरी कोसळणार आहेत. पावसामुळे शेतकऱ्याच्या पिकाचे झालेले नुकसान आणि आता परतीच्या मान्सूनचा अंदाज या दोन्हीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. एकीकडे पीक वाहून गेलं तर दुसरीकडे अजूनही पाऊस कमी व्हायचं नाव घेत नाही. राहिले साहिलेले सर्व पीक पावसामुळे धोक्यात आलं आहे.
नागरिकांना सतर्कतेचा इशारा
हवामान खात्याने सर्वसामान्य नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. नद्याच्या काठावर ओढ्याजवळ राहणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. प्रवास करताना हवामानाचा अंदाज जाणून घेऊनच घराबाहेर पडावे, कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. महाराष्ट्रात मान्सून न आता परतीचा प्रवास सुरू केला आहे. आता फक्त शेवटचा टप्पा शिल्लक आहे एवढं संकट पार करणे महत्त्वाच आहे. शेतकऱ्यांसाठी हा काळ आणखीन परीक्षेचा ठरणार आहे. पावसावर कोणाचे नियंत्रण नसते त्यामुळे सर्वांनी सुरक्षित रहावे.

2 thoughts on “राज्यावर आणखी एक मोठं संकट! हवामान विभागाच्या नवीन इशाऱ्यानं चिंता वाढली; जाणून घ्या सविस्तर”