लाडक्या बहिणीला सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार? या दिवशी ₹1,500 जमा होण्याची शक्यता

Ladki Bahin Yojana Scheme: महाराष्ट्रातील लाखो महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या सर्वत्र चर्चेत आहे. या योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत गोरगरीब महिलांना दिली जाते. ही रक्कम महिलांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी मोठा आधार बनत आहे. घर खर्च भागवण्यासाठी मुलांचे शिक्षण छोटा मोठा व्यवसाय यासाठी या रकमेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. या योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्यापर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. यानंतर महिलांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न पडत आहे.

महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना खूप उपयोगी ठरत आहे. सप्टेंबर महिन्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत मात्र अजूनही या हप्त्याबाबत सरकारने कोणतीही अपडेट दिली नाही. राज्यातील महिला बँकेच्या मेसेजवर लक्ष ठेवून आहेत. या महिन्याचा हप्ता अजून आला नाही आता कधी येणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबर महिन्यामध्ये जमा केल्यामुळे आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता ऑक्टोबर महिन्यामध्ये मिळणार काय अशी शंका महिलांच्या मनात निर्माण झाली आहे. Ladki Bahin Yojana Scheme

हे पण वाचा| राज्यावर आणखी एक मोठं संकट! हवामान विभागाच्या नवीन इशाऱ्यानं चिंता वाढली; जाणून घ्या सविस्तर

सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार?

सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्याचा हप्ता ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो. म्हणजे अजून महिलांना काही दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते. याबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नाही मात्र पुढील काही दिवसात याबाबत सरकारकडून अधिकृतपणे घोषणा केली जाईल. आतापर्यंत पाहिलं तर मागील अनेक महिन्यापासून मागील महिन्याचा हप्ता पुढील महिन्यात मिळत आहे. या अनुषंगाने सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये देखील ऑक्टोबर महिन्यात महिलांना मिळण्याची शक्यता आहे.

लाडकी बहीण योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक बळ देणे हा आहे. मात्र वेळेवर हप्ता न मिळाल्यामुळे अनेक महिलांच्या घरातील आर्थिक गणिते बिघडत आहेत. गोरगरीब महिलांसाठी 1500 रुपयाचा लाभ फार महत्त्वाचा आहे. पण प्रत्येक वेळा उशीर झाल्यामुळे अडचण निर्माण होत आहे असे महिलांचे म्हणणे आहे. दरम्यान या योजनेत घोटाळा समोर आल्यानंतर तब्बल आठ हजार सरकारी कर्मचारी लाडक्या बहिणींना या योजनेतून अपात्र करण्यात आले आहे. यानंतर सरकारने लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता निर्माण व्हावी यासाठी ई–केवायसी देखील अनिवार्य केली आहे.

लाडकी बहीण योजना फक्त पात्र गरीब व सर्वसामान्य महिलांसाठी असून सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. जवळपास 15 कोटी रुपये अशा महिलांकडून वसूल करण्याची तयारी सुरू आहे. या योजनेत वारंवार अशा प्रकारचे घोटाळे समोर आल्यानंतर सरकारने ई–केवायसी चा निर्णय घेतला आहे. आता सगळ्यांच्या नजरा सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे हप्त्याकडे लागल्या आहेत. सरकार या दोन महिन्याचे पैसे एकत्र देणार का ऑक्टोबर महिन्यात फक्त सप्टेंबर महिन्याचे पैसे देणार हे देखील पाहण्यासारखे राहणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “लाडक्या बहिणीला सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार? या दिवशी ₹1,500 जमा होण्याची शक्यता”

Leave a Comment

error: Content is protected !!