Post Office Scheme: आजकालच्या महागाईच्या काळामध्ये प्रत्येक जण सुरक्षित आणि खात्रीशीर गुंतवणुकीचा पर्याय शोधत असतो. शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवला तर नफा कमी जास्त होण्याची शक्यता असते कधी नुकसानही होऊ शकतं. त्यामुळे कुटुंबांना हवा असतो सुरक्षित पर्याय यामध्ये हमखास व्याज मिळेल आणि परतावाही चांगला मिळेल. अशाच लोकांसाठी पोस्ट ऑफिस कडून नियमित खास योजना आणल्या जातात. त्यापैकीच एक योजना म्हणजे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना (NSC). या योजनेअंतर्गत जबरदस्त परतावा मिळून दिला जातो. यामध्ये गुंतवणूक केल्यावर तुमचा पैसा 100% सुरक्षित राहतो. सरकारकडून व्याजदर निश्चित होतो आणि मुदतीनंतर खात्रीशीर फायदा मिळतो.
पाच वर्षाचा कालावधी आणि खात्रीशीर परतावा
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेचा कालावधी पाच वर्षाचा आहे. म्हणजे या योजनेत एकदा रक्कम गुंतवणूक केली तर पाच वर्षे ती रक्कम तसेच ठेवावी लागते आणि मुदत संपल्यानंतर व्याजासहित तुम्हाला पूर्ण रक्कम मिळते. सध्या या योजनेअंतर्गत 7.7% वार्षिक व्याजदर दिला जातो. सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेत चक्रवाढ पद्धतीने परतावा दिला जातो. म्हणजेच व्याजावर व्याज मिळाल्यामुळे निधी झपाट्याने वाढतो.
चार लाख रुपयाची गुंतवणूक केल्यावर किती फायदा मिळणार?
जर एखाद्या गुंतवणूकदाराने या योजनेमध्ये 4 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर पाच वर्षानंतर त्याला एकूण 5,79,613.52 मिळतील. म्हणजेच केवळ व्याजातून जवळपास 1.8 लाख रुपयाचा फायदा मिळू शकतो. सर्वसामान्य नागरिकांसाठी ही रक्कम खूप मोठी आहे. यामध्ये मुलांच्या शिक्षणासाठी लग्नासाठी किंवा भविष्यासाठी सुरक्षित ठेव म्हणून हा पैसा मोठा आधार बनू शकतो.
हे पण वाचा| लाडक्या बहिणीला सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार? या दिवशी ₹1,500 जमा होण्याची शक्यता
कर सवलतीचा फायदा
या योजनेमध्ये आणखीन एक मोठा फायदा म्हणजे आयकर कलम 80C अंतर्गत कर सवलत दिली जाते. म्हणजेच तुम्ही या योजनेमध्ये गुंतवलेल्या पैशावर कोणताही टॅक्स आकारला जाणार नाही. या फायद्यामुळे तुमच्या निधीत आणखीन वाढ होते. Post Office Scheme
इतर अतिरिक्त सुविधा
- गुंतवणूकदारांना या योजनेवरून कर्जही मिळवता येते.
- व्याजाची रक्कम पुन्हा गुंतवणुकीची सुविधा आहे.
- खाते उघडणे अगदी सोपे आहे जवळील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून तुम्ही कुठूनही खाते सुरू करू शकता.
आज-काल खाजगी कंपनीमध्ये गुंतवणूक करून फसवणुकीची घटना होण्याची शक्यता असते. पण पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास सरकारकडून पैसे बुडणार नाहीत याची हमी मिळते. त्यामुळे ग्रामीण असो किंवा शहरी लहान कुटुंब असो किंवा मोठं सर्वांनाच या योजनेमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते. जर तुमच्याकडे थोडीफार रक्कम शिल्लक असेल तर तुम्ही देखील सुरक्षित ठेवीवर चांगला परतावा मिळवायचा असेल तर पोस्ट ऑफिस ची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते.

1 thought on “Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! फक्त 4 लाख रुपयाची गुंतवणूक करा अन् मिळवा लाखोंचा फायदा..”