Aadhaar Card Download: आपल्याकडे आधार कार्ड हे अतिशय महत्त्वाचे ओळखपत्र आहे. बँकेचे व्यवहार असो शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा एखादी सरकारी नोकरीसाठी अर्ज करायचा असला तरी आधार कार्ड आवश्यक असते. पण अनेक वेळा आधारची प्रिंट हरवते किंवा घरी विसरते. अशावेळी पुन्हा आधार कार्ड काढण्यासाठी शासकीय ऑफिस मध्ये जावा लागत असे. मात्र आता काळजी करायची गरज नाही कारण सरकारने आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी व्हाट्सअप वरच एक झोपी आणि सुलभ सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
सरकारने MyGov हेल्पडेस्क बॉट सुरू केला आहे. या बॉटच्या मदतीने आपण आपल्या व्हाट्सअप वरून आधार कार्ड डाऊनलोड करू शकतो. म्हणजे आता आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी वेबसाईटवर जाऊन लॉगिन करण्याची गरज पडणार नाही. फक्त काही मिनिटात मोबाईलवरच आधारची पीडीएफ डाऊनलोड करता येईल.
आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी काय आवश्यक?
- व्हाट्सअप वर आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी मोबाईल नंबर आधार कार्ड ची लिंक असणे आवश्यक आहे.
- मोबाईल नंबर चालू स्थितीत असावा.
- आधार डिजिलॉकरची जोडलेले असणे फायदेशीर ठरेल.
आधार कार्ड व्हाट्सअप वरून कसे डाउनलोड करावे?
- सर्वप्रथम +91 9013151515 हा मोबाईल नंबर तुमच्या मोबाईल मध्ये सेव करा.
- व्हाट्सअप वर या नंबर वर Hi मेसेज पाठवा.
- त्यानंतर एक मेनू मिळेल, त्यातून digilocker services हा पर्याय निवडा.
- त्यानंतर तुमचा आधार नंबर टाका.
- मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून व्हेरिफाइड करा.
- व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर डॉक्युमेंट ची यादी दिसेल त्यातून आधार कार्ड निवडा.
- लगेच तुमच्या व्हाट्सअप वर आधारची पीडीएफ डाउनलोड होईल.
एकावेळी किती डॉक्युमेंट मिळवता येतील?
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल अशा प्रकारे आपण एका वेळी किती डॉक्युमेंट मिळू शकतो. तर यामध्ये एकाच वेळी फक्त एक डॉक्युमेंट मिळू शकतात. म्हणजे दर पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन देखील DG लॉकर ची लिंक असेल तर तेही तुम्ही अशा प्रकारे मिळू शकता. Aadhaar Card Download
हे पण वाचा| पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! फक्त 4 लाख रुपयाची गुंतवणूक करा अन् मिळवा लाखोंचा फायदा..
ओटीपी शिवाय मिळवता येईल का?
जर तुम्हाला या प्रोसेस मध्ये ओटीपी नको असेल तर UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आधार डाऊनलोड करता येते. त्यासाठी नाव जन्मतारीख लिंग अशी माहिती भरावी लागते. त्यानंतर ओटीपी च्या मदतीने ई आधार पीडीएफ डाऊनलोड करता येते.
आज कालच्या डिजिटल युगामध्ये आधार कार्ड म्हणजे प्रत्येक नागरिकांचे प्रमुख ओळखपत्र तयार झाले आहे. हे केवळ सरकारी योजनेसाठीच नाही तर पासपोर्ट, बँक खाते, शाळा कॉलेजमध्ये प्रवेश आशा असंख्य गोष्टीसाठी आधार कार्ड आवश्यक असते. अशावेळी जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुमचे काम रखडू शकते किंवा उशीर होऊ शकतो. म्हणूनच तर मोबाईल मध्ये आधारची पीडीएफ सेव करून ठेवणं उपयोगी ठरू शकते.
पूर्वी आधार कार्ड हरलं की ग्राहक सेवा केंद्राच्या लांब रांगेत उभे राहावे लागायचे आणि त्यानंतर पुन्हा प्रिंट काढण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च करावा लागायचा. पण आता सरकारने दिलेल्या या व्हाट्सअप सुविधेमुळे सगळं आधी सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही कुठेही करू शकता. अगदी काही मिनिटात घरबसल्या तुमच्या मोबाईलवर आधार पीडीएफ उपलब्ध करता येते. ग्रामीण भागातील लोकांसाठी सरकारची ही सुविधा वरदान ठरत आहे.

Chetan Ramdas Tulavi