पाऊस अजून थांबला नाही; ‘या’ जिल्ह्यांना रेड-यलो अलर्ट जारी.. वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात परतीच्या प्रवासाने धुमाकूळ घातला आहे. अनेक भागांमध्ये या पावसामुळे महापूर आले आहेत. सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत पाऊस कमी होईल असा अंदाज अनेक तज्ञांनी वर्तवला होता. पण बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांना रेड अलर्ट, यलो अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केले आहे. मागील काही दिवसापासून राज्यात जोरदार पाऊस होत असून, या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान

गेल्या 24 तासांमध्ये मराठवाडा व विदर्भात पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. लातूरच्या अहमदापूर मध्ये तब्बल 170 mm पाऊस झाला आहे. यामुळे सोयाबीन मूग उडीद कापूस यासारख्या खरीप हंगामातील प्रमुख पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी अजूनही या पावसात आपल्या पिकांची काळजी घेत आहेत. अनेक नद्यांना मोठे पूर आल्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक गोरगरीब नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे.

या भागात अलर्ट जारी…

  • या भागात रेड अलर्ट: पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाटमाथा आणि पुणे घाटमाथा
  • या भागात ऑरेंज अलर्ट: रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, आणि छत्रपती संभाजीनगर
  • या भागात यलो अलर्ट: नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, बुलढाणा, अकोला, वाशिम, सांगली, सोलापूर, हिंगोली, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली

हे पण वाचा| कोण ठरणार आशियाचा बादशहा? टीम इंडिया दुबईत विजयी होण्यासाठी सज्ज, पाकिस्तान रोखणार का?

राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशारानुसार, अतिआवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घराबाहेर पडणे टाळावे. नदीकाठच्या लोकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे. Maharashtra Weather Update

साधारणपणे या वेळेत राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशातून मान्सूनची परतफेड सुरू होते. पण यावर्षी मध्य भारतात सतत नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे महाराष्ट्रातून मान्सूनला माघारी जाण्यास उशीर झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार एक ऑक्टोबर नंतर पुन्हा बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. म्हणजेच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी?

  • प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनेचे पालन करावे.
  • नद्या नाल्यांच्या पुराच्या पाण्यापासून दूर राहावे.
  • धोकादायक घाटमाथ्यावर किंवा पाण्याने भरलेल्या ठिकाणी प्रवास करू नये.
  • हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याचे सतर्कतेने पालन करावे.

असाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “पाऊस अजून थांबला नाही; ‘या’ जिल्ह्यांना रेड-यलो अलर्ट जारी.. वाचा सविस्तर”

Leave a Comment

error: Content is protected !!