Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र राज्यातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता आणखीन एक महत्त्वाचे पाऊल उचलत आहे. आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा थेट लाभ दिला जात आहे. मात्र आता फक्त अनुदानच नाही तर महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून एक लाख रुपये पर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या कर्जावर व्याजदर झिरो टक्के असणार आहे म्हणजेच तुमच्याकडून सरकार कोणताही व्याजदर आकारणार नाही. सरकारच्या या नवीन उपक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
महिला करू शकतील स्वतःचा व्यवसाय (Loan will be available under Ladki Bahin Yojana)
गावातील अनेक गोरगरीब महिला या योजनेचा लाभ घेऊन छोटा मोठा व्यवसाय सुरू करून आपले स्वप्न पूर्ण करू शकतात. कोणाला कपड्याचा छोटा व्यवसाय सुरू करायचा आहे कोणाला किराणा दुकान तर कोणाला मसाला पापड लोणचं यासारख्या घरगुती उद्योगाची सुरुवात करायची आहे. पण आर्थिक भांडवलामुळे हातबल असल्यामुळे त्यांचे हे स्वप्न अधुरे राहत होते. अशा महिलांना सरकारच्या या निर्णयामुळे आता दिलासा मिळाला आहे. कष्ट करणाऱ्या महिलांना आर्थिक आधार देऊन मोठे भांडवल देण्याचा सरकारचा हेतू आहे.
मुंबई व उपनगरीतील महिलांनी ही योजना प्रत्यक्षात सुरू देखील केली आहे. 3 सप्टेंबर पासून मुंबई बँके मार्फत लाडक्या बहिणींना एक लाख पर्यंतचे कर्ज 0% व्याजदरावर दिले जाणार आहे. राज्यातील इतर भागात देखील ही योजना लवकरच सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती प्रसारमाध्यमाच्या वतीने समोर आली आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिलांना आता स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळणार आहे. तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्ही या योजनेच्या मदतीने सरकारकडून झिरो टक्के व्याजदराने कर्ज घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकणार आहेत.
हे पण वाचा| पाऊस अजून थांबला नाही; ‘या’ जिल्ह्यांना रेड-यलो अलर्ट जारी.. वाचा सविस्तर
सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार? (Ladki Bahin Yojana September month installment)
लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत ऑगस्ट महिन्यापर्यंत महिलांच्या खात्यात 1500 रुपये प्रमाणे सर्व रक्कम जमा करण्यात आली आहे. यानंतर राज्यातील महिलांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न पडला आहे. सप्टेंबर महिना संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र अजूनही सरकारने हा हप्ता महिलांना कधी मिळणार याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्याचा हप्ता पुढील महिन्यात म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो.
लाडकी बहीण योजनेची e–kyc आवश्यक (Ladki Bahin Yojana eKYC)
राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई केवायसी आवश्यक केली आहे. तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल आणि तुम्हाला या योजनेचे दर महिन्याला 1500 रुपये न चुकता मिळवायचे असतील तर लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करणे विसरू नका. या योजनेत पारदर्शकता निर्माण करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. ज्या महिला पुढील दोन महिन्यांमध्ये ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत त्या महिलांना या योजनेतून अपात्र ठरवले जाणार आहे. ई–केवायसी करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे तुम्ही मोबाईलवर घरबसल्या देखील ही प्रक्रिया करू शकता. जर तुम्हाला जमत नसेल तर जवळील सीएससी केंद्रात जाऊन तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकता.
2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार? (Ladki Bahin Yojana)
लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या दरमहा 1500 रुपयांचा लाभ दिला जात आहे. हे पैसे महाडीबीटी द्वारे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट जमा केले जातात. विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा आमची सत्ता आली तर आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा लाभ देऊ अशा आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्याचे अंमलबजावणी कधीपासून होणार असा प्रश्न महिलांना पडला आहे. याबाबतची अधिकृत तारीख अजूनही जाहीर झालेली नाही. त्यामुळे महिला संभ्रमात आहेत की, 2100 रुपयाचा लाभ नक्की मिळणार आहे का नाही?
कर्जाचा हप्ता कसा असणार? (Majhi Ladki Bahin Yojana)
लाडक्या बहिणींना दिल्या जाणाऱ्या कर्जाचा हप्ता कशा प्रकारचा असणार असा प्रश्न अनेक जणांच्या मनात उपस्थित झाला असेल. मिळालेल्या माहितीनुसार या कर्जाचा हप्ता लाडकी बहिणी योजनेच्या लाभातूनच वसूल केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. म्हणजेच महिलांना या कर्जाचे ओझे उचलावे लागणार नाही. लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा मिळणाऱ्या लाभातूनच महिला या कर्जाचा हप्ता भरू शकतील. सरकारचा हा उपक्रम महिला सशक्तिकरण करण्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरणार आहे.

2 thoughts on “Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना व्यवसाय करण्यासाठी झिरो टक्के व्याज दरावर मिळणार कर्ज? जाणून घ्या सविस्तर”