ऑक्टोबर महिना सुरू! पण लाडकीला सप्टेंबरचे ₹1500 कधी मिळणार? संभाव्य तारीख समोर

Ladki Bahin Yojana: राज्यातील लाखो गोरगरीब महिलांसाठी सुरू केलेले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरुवातीपासूनच सर्वत्र चर्चेत आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपयाची आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा केली जाते. या योजनेअंतर्गत उशिरा का होईना महिलांना हा हप्ता दिला जातो. सध्या सप्टेंबर महिन्याचा हप्ता महिना संपला आहे तरी महिलांना 1500 रुपये मिळाले नाही. त्यामुळे महिलांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होत आहे सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार?

सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार? (When will I get the Ladki Bahin Yojana for the month of September?)

सप्टेंबर महिना संपून ऑक्टोबर महिन्यात सुरुवात झाली आहे. तरीही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. त्याचबरोबर प्रशासनाकडून अद्याप हा हप्ता कधी मिळणार याची कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. त्यामुळे महिलांच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो. या महिन्यांमध्ये दिवाळी सारखे मोठे सण असल्यामुळे एखाद्या सणाचे निमित्य साधून राज्य सरकार महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा| लाडक्या बहिणींना व्यवसाय करण्यासाठी झिरो टक्के व्याज दरावर मिळणार कर्ज? जाणून घ्या सविस्तर

दिवाळीनिमित्त 2 हप्त्याचे 3000 रुपये एकत्रित मिळू शकतात (September and October installments)

या महिन्यामध्ये येत्या काही दिवसातच सप्टेंबर महिन्याचा आता जमा होऊ शकतो. जर हप्ता आता जमा झाला नाही तर ऑक्टोबर आणि सप्टेंबर अशा दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये दिवाळीनिमित्त महिलांच्या खात्यात जमा केले जाऊ शकतात. दिवाळी सण जवळ आला आहे या सरा निमित्त सरकारकडून महिलांना आनंद देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे महिलांना दुहेरी आनंद मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. Ladki Bahin Yojana

E–kyc केली नाही तर लाभ बंद (Ladki Bahin Yojana eKYC)

या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. लाडक्या बहिणींना केवायसी करण्यासाठी सरकारने दोन महिन्याची मुदत दिली आहे. सरकारने दिलेल्या तारखेत केवायसी पूर्ण न केल्यास योजनेचा लाभ बंद केला जाणार आहे. त्यामुळे अजून केवायसी न केलेल्या महिलांनी तातडीने आपली प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्वतः केवायसी कशी करावी याबद्दल सर्व माहिती दिलेली आहे. महिला ऑनलाईन पद्धतीने ही केवायसी प्रक्रिया अगदी सहजपणे घरबसल्या करू शकतात.

महिलांसाठी लाडकी बहीण योजना महत्त्वाची (Ladki Bahin Yojana Scheme)

लाडक्या बहिणींना या योजनेचे पैसे वेळेत दिले तर घर खर्च भागवण्यास मदत होते. पण राज्य सरकारकडून प्रत्येक हप्ता एक महिना उशिरा महिलांच्या खात्यात जमा केला जात आहे. आता तरी सरकारने दिवाळीनिमित्त महिलांना दोन हप्त्याचे पैसे एकत्रित द्यावे असे अपेक्षा लाडक्या बहिणींकडून केली जात आहे. खरंतर ग्रामीण भागातल्या महिलांसाठी हा 1500 रुपयांचा लाभ जीवन जगण्यासाठी वरदान ठरत आहे. सरकारचा उद्देश महिलांना आर्थिक दृष्ट्या प्रबळ बनवण्याचा असला तरी वेळेवर हप्ता मिळाला नाही तर त्याचे महत्त्व कमी होते. आता राज्यातील सर्व महिलांच्या नजरा ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याकडे देखील लागल्या आहेत. दिवाळीनिमित्त जर सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रित दिले तर महिलांना नक्कीच मोठा आर्थिक आधार मिळेल.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “ऑक्टोबर महिना सुरू! पण लाडकीला सप्टेंबरचे ₹1500 कधी मिळणार? संभाव्य तारीख समोर”

Leave a Comment

error: Content is protected !!