दसऱ्याच्या आधी महागाईचा भडका! एलपीजी गॅस सिलिंडर महागला; जाणून घ्या नवीन दर

LPG Gas Cylinder Price: दसऱ्याच्या एक दिवस अगोदरच सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा मोठा झटका बसला आहे. आज एक ऑक्टोबर पासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती पुन्हा एकदा वाढ झाली आहे. या आधी सलग पाच वेळा व्यवसायिक एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त झाले होते. मात्र ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. देशातील सरकारी तेल दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलेंडरच्या किमती जाहीर करत असतात. त्यानुसार 19 किलो व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली आहे.

किती रुपयांनी वाढले गॅस सिलेंडर? (LPG gas cylinder price)

आज पासून मुंबईमध्ये 19 किलो व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत तब्बल 15.15 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे आता या सिलेंडरची किंमत 1547 रुपये एवढी झाली आहे. घरगुती वापरणारा 14.2 किलोचा एलपीजी गॅस सिलेंडर मध्ये कोणताही बदल झाला नाही. मुंबईमध्ये तो पूर्वीप्रमाणेच 852.50 रुपयांनी उपलब्ध आहे. मागील काही महिन्यापासून घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती स्थिर आहेत.

हे पण वाचा| ऑक्टोबर महिना सुरू! पण लाडकीला सप्टेंबरचे ₹1500 कधी मिळणार? संभाव्य तारीख समोर

व्यावसायिक सिलेंडर वाढल्याने काय परिणाम होणार (Commercial LPG gas cylinder price)

19 किलो व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यच्या खिशावर देखील परिणाम होऊ शकतो. 19 किलोचा सिलेंडर प्रामुख्याने हॉटेल रेस्टॉरंट मिठाई दुकानात वापरला जातो. त्यामुळेच या गॅस सिलेंडरला सर्वसामान्य भाषेत हलवाई सिलेंडर असे म्हटले जाते. या सिलेंडरच्या किमतीमध्ये सणासुदीच्या तोंडावर वाढ झाल्यामुळे हॉटेलमधल्या वस्तूच्या किमती देखील वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये दिवाळीच्या तोंडावर मिठाईच्या किमतीत वाढ होऊ शकते. आणि हॉटेलमध्ये जेवणाचा खर्च अधिक होणार आहे.

घरगुती सिलेंडर मध्ये कोणताही बदल नाही (Domestic LPG gas cylinder price)

दरम्यान आज घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. एप्रिल महिन्यात या किमतीमध्ये बदल झाला होता त्यानंतर आतापर्यंत या सिलेंडरच्या किमती स्थिर आहेत. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

महागाईचा तडका (Inflation hit)

सरकारकडून जीएसटी कपात करून देखील मिळाला नाही. त्यात आता सणासुदीच्या तोंडावर पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाल्यामुळे याची झळ नागरिकांना सहन करावी लागू शकते. नवरात्र आणि दसरा साजरा करण्यासाठी अधिक खर्च करावा लागू शकतो. त्याचबरोबर दिवाळी सारखा मोठा सण समोर आला आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी आता अतिरिक्त खर्च वाढू शकतो. थोडक्यात सांगायचं झालं तर ऑक्टोबरच्या पहिल्या दिवशी व्यवसायिक एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत वाढली आहे आणि घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत स्थिर आहे. मात्र सणासुदीच्या दिवसात झालेली वाढ तुमच्या खिशावर परिणाम करू शकते.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “दसऱ्याच्या आधी महागाईचा भडका! एलपीजी गॅस सिलिंडर महागला; जाणून घ्या नवीन दर”

Leave a Comment

error: Content is protected !!