लाडकी बहीण योजनेची e-KYC कशी करावी? ई-केवायसी बाबत अजित पवार यांचे मोठं विधान..

Ladki Bahin Yojana eKYC: महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक आधार देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेबाबत सरकारने नवीन धोरण आकारले आहे. या योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपयांचा आर्थिक लाभ मिळवण्यासाठी लाडक्या बहिणींना ई–केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत गोरगरीब महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांचा लाभ मिळावा आणि यामध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी सरकारने हा नवीन नियम लागू केला आहे. त्यापैकीच महत्त्वाचा म्हणजे ई केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार? (Ajit Pawar On Ladki Bahin Yojana)

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या दौऱ्यामध्ये महिलांशी संवाद साधताना या नियमाबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी यावेळी म्हटले आहे की, सरकारचा पैसा जनतेसाठी आहे तो चुकीच्या पद्धतीने खर्च होऊ नये किंवा मयत व्यक्तीच्या नावावर हप्ता जाऊ नये यासाठी ई केवायसी प्रक्रिया आवश्यक करण्यात आली आहे. योग्य लाभार्थ्यांना च या योजनेचा फायदा मिळावा आणि या योजनेत पारदर्शकता निर्माण व्हावी यासाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

अनेक वेळा शासनाच्या योजनेमध्ये असे गैरप्रकार घडतात की, लाभार्थ्याचा मृत्यू होतो तरीदेखील त्याच्या नावावर पैसे घेतले जातात. लाभार्थी यादीतून त्याचे नाव काढले जात नाही. अशावेळी अनावश्यकपणे सरकारी पैसा चुकीच्या खात्यात जमा केला जातो. हाच प्रकार रोखण्यासाठी सरकारने ई केवायसी बंधनकारक केली आहे. लाभार्थी महिलांनी घाबरून जायचे कारण नाही, अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, सरकारने यासाठी दोन महिन्याची मुदत दिली आहे. या कालावधीत ई केवायसी पूर्ण केली नाही तर योजनेचा लाभ थांबू शकतो. त्यामुळे वेळ न वाया घालता ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करा प्रत्येक लाभार्थी महिलांसाठी ही प्रक्रिया अतिशय आवश्यक आहे.

हे पण वाचा| 1 ऑक्टोबर पासून UIDAI चा नवीन निर्णय! आता आधार कार्ड अपडेटसाठी जास्त पैसे द्यावे लागणार; जाणून घ्या सविस्तर

ई–केवायसी कशी करावी? (How to do Ekyc of Ladki Bahin Yojana?)

  • सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • तुमचं नाव पत्ता रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला हे कागदपत्र जवळ ठेवा.
  • आधार नंबर टाका आणि आलेला ओटीपी अचूक भरा.
  • कॅप्चर पोट भरून प्रक्रिया पूर्ण करा.
  • यासाठी लाभार्थी महिलांचा आधार कार्ड ओटीपी आणि तिच्या नवऱ्याचा किंवा वडिलांचा आधार कार्ड ओटीपी आवश्यक आहे.

अगदी सोप्या पद्धतीने महिला ई केवायसी प्रक्रिया घरबसल्या देखील करू शकतात. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर योजनेचा हप्ता नियमितपणे मिळत राहील. Ladki Bahin Yojana eKYC

ग्रामीण भागातील अनेक महिलांना आजही स्थिर उत्पन्नाचे साधन मिळत नाही. अशा महिलांसाठी लाडकी बहीण योजना वरदान ठरली आहे. अनेक महिलांना काम नसलं तरी त्यांचं घर खर्च भागवण्यासाठी या योजनेचा पैसा उपयोगी पडत आहे. म्हणून ही योजना अनेकांच्या दृष्टीने आर्थिक पाठबळ देणारी ठरत आहे. अजित पवारांच्या वक्तव्यामुळे आता स्पष्ट झाले आहे की सरकारचा उद्देश कोणाचाही हक्क हिरावून घेणे नसून योग्य लाभार्थ्यांपर्यंत पैसे पोहोचावेत हा आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र महिलांनी लाडकी बहीण योजनेची ई केवायसी ची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “लाडकी बहीण योजनेची e-KYC कशी करावी? ई-केवायसी बाबत अजित पवार यांचे मोठं विधान..”

Leave a Comment

error: Content is protected !!