शेतकऱ्यांसाठी पोस्ट ऑफिस ची भन्नाट योजना! फक्त एवढ्या दिवसात गुंतवणूक दुप्पट करते? जाणून घ्या सविस्तर..

Post Office Scheme To Double The Money: प्रत्येक जणांना त्यांच्या भविष्यासाठी थोडीफार गुंतवणूक करून अडचणीसाठी भांडवल निर्माण करायचे असते. प्रत्येक जण आपल्या कष्टाचा पैसा कोणत्यातरी एखाद्या सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक इच्छित असतात. अशावेळी पोस्ट ऑफिसच्या योजना सर्वसामान्यांच्या विश्वासावर खऱ्या उतरतात. पोस्ट ऑफिस मध्ये अशा अनेक बचत योजना आहेत ज्यामध्ये 100% सुरक्षितता मिळते. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक करणाऱ्यांना आजही पोस्ट ऑफिसच्या योजनेवर खूप विश्वास आहे. पोस्ट ऑफिसच्या अशाच योजने पैकी एक म्हणजे किसान विकास पत्र योजना.

काय आहे किसान विकास पत्र योजना? (Kisan Vikas Patra Yojana – KVP)

ही योजना देशातील गोरगरीब शेतकऱ्यांसाठी राबवण्यात आली आहे. जर तुमच्याकडे एक हजार रुपये असतील तर तुम्ही किसान विकास पत्र योजनेमध्ये गुंतवणूक सुरू करू शकता. यात विशेष म्हणजे गुंतवणुकीवर कोणतेही कमाल मर्यादा नाही. तुम्हाला हवे तेवढे पैसे या योजनेत गुंतवता येतात. आपण आज याच योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

या योजनेत गुंतवणूक दुप्पट कशी होते? (How does investment double in a post office scheme?)

किसान विकास पत्र योजनेचे सर्वात मोठे आकर्षक म्हणजे चक्रवाढ व्याज— समजा जर तुम्ही एक लाख रुपये या योजनेमध्ये गुंतवले तर 7.5% व्याजदराने पहिल्या वर्ष अखेरीस तुम्हाला सुमारे 7,500 रुपये व्याज मिळेल. हे व्याज तुमच्या मूळ रकमेत जोडले जाते आणि पुढील वर्षी त्या वाढलेल्या रकमेवर देखील तुम्हाला व्याज दिले जाते. यामुळे तुमचे भांडवल हळूहळू वाढते आणि जवळपास नऊ वर्ष सहा महिन्यात तुमची एकूण गुंतवणूक दुप्पट होते. म्हणजेच पाच लाख रुपये गुंतवले तर 9.5 वर्षात दहा लाख रुपये परत मिळतील.

हे पण वाचा| 19 ऑक्टोबरपासून या राशींच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होणार, सर्व कामातील अडथळे सुटणार..

या योजनेत कोण गुंतवणूक करू शकतो? (Eligibility for Kisan Vikas Patra Yojana)

ही योजना फक्त शेतकऱ्यांसाठीच नाही तर कोणीही सर्वसामान्य व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकतात. एक व्यक्तीला कितीही खाती उघडण्याची परवानगी आहे. दहा वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांच्या नावाने देखील खाते उघडता येते. यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्य या बचत योजनेत सहभागी होऊ शकतात. Post Office Scheme To Double The Money

किसान विकास पत्र योजनेचे वैशिष्ट्ये (Features of Kisan Vikas Patra Scheme)

आजकालच्या काळात गुंतवणूक जोखीमेची मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे प्रत्येक जण शेअर मार्केट म्युच्युअल फंड चा धोका टाळण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या अशा योजनेत गुंतवणूक करतात. या योजनेमध्ये सर्वसामान्य लोकांना सुरक्षेची पूर्ण हमी मिळते. त्याचबरोबर ही सरकारी योजना असल्यामुळे यामधील जोखीम पूर्णपणे नाहीशी होते. त्याचबरोबर व्याजदर देखील आकर्षक दिला जातो. ठराविक काळानंतर तुम्ही गुंतवलेली रक्कम चक्क दुप्पट होते.

आज-काल महागाई झपाट्याने वाढत आहे. रोजच्या खर्चामध्ये कष्टाने कमवलेला सर्व पैसा उडतो आणि बचत शिल्लक राहत नाही. पैशाची गरज आपल्याला केव्हाही पडू शकते अचानक कोणती इमर्जन्सी निर्माण होईल सांगता येत नाही. अशावेळी भविष्याचा विचार करून शहाणपणाने केलेली बचत नक्कीच फायद्याची ठरते. किसान विकास पत्र योजना म्हणजे गावाकडच्या बँकासारखी पूर्ण सुरक्षेची हमी मिळते. जर तुम्हाला देखील जोखीम न घेता पैसा दुप्पट करायचा असेल तर या योजनेमध्ये गुंतवणूक करा नक्कीच फायद्याची ठरेल.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

2 thoughts on “शेतकऱ्यांसाठी पोस्ट ऑफिस ची भन्नाट योजना! फक्त एवढ्या दिवसात गुंतवणूक दुप्पट करते? जाणून घ्या सविस्तर..”

Leave a Comment

error: Content is protected !!