e-KYC बाबत नवीन अपडेट! OTP येत नाही यावर आदिती तटकरे यांनी दिली महत्त्वाची माहिती

Ladki Bahin eKYC: राज्यातील महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण एक वर्ष पूर्ण होऊन गेले आहे. या योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत केली जाते. या योजनेचा लाभ घेऊन राज्यातील लाखो महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या आहेत. दरम्यान सरकारने या योजनेत पारदर्शकता आणि या योजनेचा होणारा गैरवापर रोखण्यासाठी ई केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महिलांना अनेक अडचणी येत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या समस्याचे समाधान कसे करावे असा प्रश्न महिलांकडून उपस्थित होत आहे.

ई–केवायसी करण्यास अडथळे

लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करताना काही महिलांना सतत एरर दाखवत आहे. ही केवायसी प्रक्रिया महिलांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सर्वात मोठी समस्या म्हणजे ओटीपी मोबाईलवर येत नाही. ओटीपी आला तर भरण्याचा रकाना येत नाही. यामुळे महिलांच्या मनात दिवाळीसाठी हप्ता मिळणार का नाही? अशी शंका निर्माण झाली आहे. जर पोर्टल व्यवस्थित चालले नाही तर पैसे उशिरा मिळणार का? असा प्रश्न देखील महिलांच्या मनात उपस्थित होत आहे. दरम्यान आदिती तटकरे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. Ladki Bahin eKYC

हे पण वाचा| दिवाळीपूर्वी पीएम किसान योजनेच्या 21 व्या हप्त्याचे ₹2,000 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता? त्यापूर्वी हे काम करणे आवश्यक..

आदिती तटकरे यांची खात्रीशीर माहिती

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या समस्यावर गांभीर्याने पाहिले जात असल्याचे सांगितले आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत स्पष्ट केले आहे की, “ई–केवायसी प्रक्रिया ओटीपी संदर्भात काही तांत्रिक अडचणी येत आहेत. मात्र तज्ञांच्या मदतीने यावर लवकर उपयोजना सुरू करून लवकरात लवकर ही समस्या दूर केली जाईल. महिलांनी अजिबात काळजी करू नये प्रक्रिया अगदी सोपी व सोईस्कर होईल याची हमी आम्ही देत आहोत.” असे आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. आदिती तटकरे यांच्या या वक्तव्यानंतर महिलांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

ई–केवायसी कशी करावी?

सरकारने ही प्रक्रिया अनिवार्य केल्यानंतर अनेक महिलांना असा प्रश्न पडला आहे की, ही प्रक्रिया नेमकी कशी करावी? सरकारने ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करून दिली आहे. महिलांनी घरबसल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरच्या मदतीने फक्त काही मिनिटांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करता येते.

  • सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • पहिल्या पेजवर ई केवायसी पर्याय निवडा.
  • आधार क्रमांक व कॅप्चर कोड टाकून सेंड ओटीपी या बटणावर क्लिक करा.
  • मोबाईलवर आलेला आधार ओटीपी टाकून सबमिट करा.
  • त्यानंतर तुमचं नाव पात्र यादीत नाव आहे का? हे तपासले जाईल.
  • त्यानंतर पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकून ओटीपी पाठवा.
  • जात प्रवर्ग निवडा व आवश्यक अटींना होकार द्या.
  • सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा.
  • “ई–केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली” असा मेसेज दिसेल.

सरकारने अचानक या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ई केवायसी प्रक्रिया करणे आवश्यक केल्यानंतर महिलांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. त्यानंतर ओटीपी मुळे अनेकांना ई–केवायसी करण्यास अडथळे निर्माण झाले. मात्र सरकारकडून तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे दिवाळीच्या आधी महिलांना हप्ता मिळेल का नाही हे सांगता येत नाही. लाडकी बहीण योजना ही केवळ पैशाची मदत नसून महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. या योजनेचा लाभ दिवाळीला मिळाला तर अनेक कुटुंबांच्या घरात दिवा उजळेल.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “e-KYC बाबत नवीन अपडेट! OTP येत नाही यावर आदिती तटकरे यांनी दिली महत्त्वाची माहिती”

Leave a Comment

error: Content is protected !!