Gold Rate Today: सणासुदीच्या काळात प्रत्येक जण सोन्याचे खरेदी करतात. लग्न सराई असो किंवा दसरा दिवाळी सोन्याच्या खरेदी शिवाय या सणांमध्ये उत्सुकता वाढत नाही. पण गेल्या काही दिवसापासून सोन्याचे भाव सर्वसामान्यांच्या हाता बाहेर गेली आहेत. दसऱ्यानिमित्त सोन्याचे किमतीत थोडीशी घसरण झाली होती मात्र पुन्हा आता सोन्याची किमतीने मोठी झेप घेतली आहे. वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. आज या लेखामध्ये आपण आज सोन्याची किंमत काय आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
24 कॅरेट सोन्याचा दर
आज 24 कॅरेट एक तोळा सोन तब्बल 870 रुपयांनी महाग झाले आहे. त्यामुळे एक तोळे सोने खरेदी करण्यासाठी 1,19,400 रुपये द्यावे लागत आहेत. त्याचबरोबर आठ ग्रॅम सोन्याचा दर 95 हजार 520 रुपये एवढा झाला आहे. जे गुंतवणुकीच्या दृष्टीने एकदाच मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतात त्यांना दहा तोळ्या मागे तब्बल 8700 रुपये जास्त द्यावे लागत आहेत. 24 कॅरेट दहा तोळ्याचा दर 11 लाख 94 हजार रुपये एवढा झाला आहे.
22 कॅरेट सोन्याचा दर
सणानिमित्त सोन्याच्या दागिने मोठ्या प्रमाणात खरेदी केले जाते. सोन्याचे दागिने 22 कॅरेट सोन्यापासून बनवले जातात. 22 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये देखील आठशे रुपयांनी वाढ झाली आहे. आज 22 कॅरेट दहा ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी एक लाख 9 हजार 450 रुपये द्यावे लागत आहेत. त्याचबरोबर दहा तोळे सोने खरेदी करण्यासाठी दहा लाख 94 हजार 500 रुपये द्यावे लागत आहेत.
हे पण वाचा| e-KYC बाबत नवीन अपडेट! OTP येत नाही यावर आदिती तटकरे यांनी दिली महत्त्वाची माहिती
18 कॅरेट सोन्याची किंमत
काहीजण हलके दागिने खरेदी करतात. आशांसाठी 18 कॅरेट सोन्याचे दर महत्वाचे असतात. मात्र यामध्ये देखील वाढ झाली आहे. आज 18 कॅरेट दहा ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी 89 हजार 550 रुपये द्यावे लागत आहेत. यामध्ये तब्बल 650 रुपयाची वाढ झाली आहे. त्याचबरोबर दहा तोळा सोना खरेदी करण्यासाठी आठ लाख 95 हजार पाचशे रुपये द्यावे लागत आहेत. Gold Rate Today
मागील काही दिवसापासून सतत सोन्याच्या किमतीत वाढ झाल्यामुळे ग्राहक हतबल झाले आहेत. परंपरेनुसार दसरा दिवाळीला सोने खरेदी करणं शुभ मानला जात असलं तरी वाढत्या किमतीमुळे अनेकजण सोने खरेदी टाळत आहेत. त्याचबरोबर या किमतीत जीएसटी आणि इतर कर जोडले तर दर आणखीन वाढतात. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांनी आता सोनं खरेदी कसं करावं असा प्रश्न उपस्थित होत आहे. सोन्याचे दर नेहमीच कमी जास्त होत असतात पण गेल्या काही महिन्यापासून सोन्याचे दर सातत्याने वाढतच आहे. सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानली जाते त्यामुळे अनेक लोक यात गुंतवणूक करण्यासाठी सोने खरेदी करतात. तुम्हीदेखील सोन्यात गुंतवणूक करू इच्छित असाल किंवा सोन्याचे दागिने खरेदी करू इच्छित असाल तर हा लेख तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.
