शेतकरी पुत्र मंगेश साबळे यांचे आमरण उपोषण! उपोषणाचा सातवा दिवस तब्येत बिघडली सरकारची भूमिका काय?

Mangesh Sable Uposhan: शेतकरी पुत्र मंगेश साबळे यांनी तहसील कार्यालय सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आमरण मागील सात दिवसापासून सुरू केले आहे. आज उपोषणाचा सातवा दिवस आहे. सरपंच मंगेश साबळे यांची तब्येत खलावली आहे. त्यांच्या सरकारकडून मागण्या स्पष्ट आहेत. मात्र प्रशासनाकडून त्यांच्या उपोषणाची व मागण्याची कोणतीही दखल घेतली जात नाही. मंगेश साबळे यांच्या चक्क नाकातून रक्त वाहू लागले आहे. आपला देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. मात्र याच देशात आपल्या शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवण्यासाठी अशा प्रकारचा लढा द्यावा लागतो.

शेतकरी पुत्र मंगेश साबळे यांच्या प्रमुख मागण्या (Key demands of farmer’s son Mangesh Sable)

1) ढगफुटी झाल्यामुळे दुष्काळ जाहीर करून एकरी 50,000/- सरसकट मदत द्यावी.
2) सरसकट कर्ज माफी तात्काळ करावी.
3) ज्या शेतकऱ्यांची शेतातील माती वाहून गेली आहे त्यांना एकरी ₹1,00,000/- मदत जाहीर करावी.
4) ज्या शेतकऱ्यांची जनावरे (गाय, बैल, म्हैस, रेडा, घोडा, इ.) पुरात वाहून गेल्यास प्रत्येकी 50,000/-मदत द्यावी.
5) रब्बी हंगामासाठी वी-बियाणे व खत मोफत उपलब्ध करून द्यावे.
6) शेतकऱ्यांचे घरगुती वीज बिल एक वर्ष माफ करण्यात यावे.
7) शेतकऱ्यांच्या मुलांचे 2025-26 या शैक्षणिक वर्षाचे शुल्क माफ करावे.
8) शेळी-मेंढी पुरात वाहून गेल्यास प्रत्येकी 10,000/- मदत जाहीर करावी.
9) पिक विमा फक्त 1/- मध्ये रब्बी हंगामासाठी उपलब्ध करुन द्यावा.
10) पुराचे पाणी घरात गेलेल्या प्रत्येक कुटुंबास 1,00,000/- मदत द्यावी.
11) वीज पडून व पुरामुळे मृत्यू झाल्यास कुटुंबियांना 10,00,000/- मदत द्यावी.
12) शेतकरी आत्महत्येच्या प्रकरणात ₹10,00,000/- मदत जाहीर करावी.
13) गावांना जोडणारे रस्ते व पूल तातडीने दुरुस्त करून ज्या पुलांची उंची कमी आहे ती वाढवावी.
14) मनरेगा व पोखरा योजनेचे काम तातडीने सुरु करावे.
15) पुरामुळे पडझड झालेल्या घर व विहिरींसाठी नवीन काम व मदत द्यावी.
16) मदत देताना गरीब-श्रीमंत, कोरडवाहू बागायती, कच्चे पक्के बांधकाम असे निकष न लावता सर्वांना समानतेने मदत द्यावी.
17) जनावरांसाठी तात्काळ चारा छावण्या सुरु कराव्यात.
18) ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर होल्ड आहे ते तातडीने काढावा.

हे पण वाचा| शेतकऱ्यांसाठी पोस्ट ऑफिस ची भन्नाट योजना! फक्त एवढ्या दिवसात गुंतवणूक दुप्पट करते? जाणून घ्या सविस्तर..

प्रशासनाची प्रतिक्रिया

मंगेश साबळे यांनी आपल्या मागण्या प्रशासनासमोर मांडल्या आहेत. मात्र जिल्हाधिकारी कडून या मागण्या पूर्ण करणे शक्य नाहीत अशी स्पष्ट भूमिका देण्यात आली. यावर मंगेश साबळे यांनी “मग आमच्या मातीला या आम्ही माघार घेणार नाही” अशी भूमिका स्पष्ट केली आहे. त्याचबरोबर पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी देखील याबाबत कोणतीही दखल घेतली नाही. सरपंच मंगेश साबळे यांची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणावरून या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शेतकरी उपोषण ठिकाणी उपस्थिती लावत आहेत. Mangesh Sable Uposhan

मंगेश साबळे यांची प्रकृती

उपोषणाचा सातवा दिवस उजाडला आहे मात्र अजूनही प्रशासनाने याबाबत कोणती दखल न घेतल्यामुळे मंगेश साबळे यांची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. मागील सहा दिवसापासून हे आमरण उपोषण सुरू असल्यामुळे त्यांच्या नाकातून रक्त पडत आहे. आपला देश हा कृषिप्रधान देश मानला जातो मात्र याच देशात एका शेतकरी पुत्राला शेतकऱ्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी अशा प्रकारचे तीव्र आंदोलन करावे लागते की मोठी शोकांतिका आहे. हे आंदोलन अशाच प्रकारे आणखीन तीव्र होत चालले आहे. वेगवेगळ्या ठिकाणावरील शेतकरी आणि शेतकरी पुत्र रस्त्यावर उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत.

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!