Kojagiri Purnima 2025: हिंदू पंचांगानुसार आश्विन महिन्याच्या पौर्णिमेला येणारी कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच सुख समृद्धीचा आणि आनंदाचा दिवस मानला जातो. या रात्री चंद्र आपल्या 16 कलांसह पृथ्वीवर उतरतो असं म्हटलं जातं. चंद्राच्या त्या उज्वल प्रकाशात जेव्हा आपण दुधाचा आस्वाद घेतो तेव्हा फक्त शरीरच नव्हे तर मन देखील निर्मळ होते असे देखील म्हटले जाते. या रात्री चंद्राचे किरण धन आरोग्य आणि सौभाग्य देणारे असतात. यावर्षी देखील कोजागिरी पौर्णिमा अनेक नागरिकांसाठी खास ठरणार आहे. कारण 48 तासानंतर म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी दुपारी 12 वाजून 44 मिनिटांनी चंद्र शनिच्या कुंभ राशीत प्रवेश करेल. या शुभ योगाचा प्रभाव काही राशींवर चांगला होणार आहे. सनी आणि चंद्राचा हा संयोग अनेक लोकांसाठी धनप्राप्ती आणि मानसन्मान वाढवणारा ठरणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशीवर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी धनवर्षाव होणार आहे.
- 1) मेष राशी —
मेष राशींच्या व्यक्तींसाठी कोजागिरी पौर्णिमेची रात्र सुवर्णसंधी घेऊन येणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे आता पूर्ण होतील. पूर्वी घेतलेले निर्णय योग्य ठरतील आणि आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. घरात लक्ष्मी मातेची कृपा होईल. ज्यांच्यावर कर्ज आहे त्यांचे कर्ज दूर होईल. ऑफिसमध्ये उच्च अधिकाऱ्यांकडून जबाबदारी व प्रशंसा मिळण्याची शक्यता आहे. मेहनतीचा योग्य लाभ मिळेल, अनेक लोकांवर धनवर्षाव होईल.
हे पण वाचा| 19 ऑक्टोबरपासून या राशींच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होणार, सर्व कामातील अडथळे सुटणार..
- 2) तुळ राशी—
तूळ राशीतील लोकांसाठी कोजागिरी पौर्णिमा खूप शुभ राहणार आहे. या दिवशी नवीन व्यवहार, नवीन घर गाडी खरेदी करण्याचा योग निर्माण होईल. तुमच्या प्रयत्नाला यश मिळेल बँकेत धनवृद्धी होईल. व्यावसायिकांना अचानक मोठा नफा मिळू शकतो. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. मित्र नातेवाईकाकडून सहकार्य व शुभ बातम्या मिळतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि समाजातील प्रतिष्ठा सुद्धा वाढेल.
- 3) सिंह राशी —
सिंह राशीतील व्यक्तींसाठी हा दिवस अत्यंत आनंदाचा आहे. जुन्या गुंतवणुकीतून किंवा थकलेली रक्कम परत मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेली कामगिरी प्रभावशाली असेल. अधिकारी तुमच्यावर अत्यंत खूष असतील. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा योग्य काळ असणार आहे. घरात शुभ प्रसंग घडून येतील. मुलांच्या प्रगतीने खुश होतान, नशीब तुमच्या बाजूने असेल आणि प्रत्येक प्रयत्नांना यश मिळेल. Kojagiri Purnima 2025
कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व
कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात दूध ग्रहण केल्याने मनशांती मिळते. लोक घराच्या अंगणात किंवा छतावर एकत्र बसून दूध जाळून प्रसाद घेतात. चंद्राच्या साक्षीने देवी लक्ष्मीची आवाहन करतात. या रात्री आज कोण जागा आहे असा प्रश्न लक्ष्मी मातेला विचारला जातो आणि तिच्या स्वागताला जागे असतात त्यांच्यावर लक्ष्मी मातेची कृपा होते असे मानलं जाते. यावर्षीची कोजागिरी पौर्णिमा फक्त चंद्राच्या सौंदर्यासाठी नाही तर तुमच्या भाग्याच्या उजळण्याची ठरणार आहे. पुढील 48 तासांमध्ये तुम्हाला परिवर्तन होताना दिसेल. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्या सोबत कायम राहो हीच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी प्रार्थना.
(Disclaimer: हा लेख धार्मिक श्रद्धा पंचांग आणि उपलब्ध माहितीनुसार लिहिलेला आहे. याचा उद्देश फक्त सर्वसामान्य पर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

1 thought on “48 तासांत या राशींचे नशीब बदलणार! कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री ‘या’ राशींच्या लोकांवर होणार धनलक्ष्मीचा वर्षाव..”