Electricity bill : महागाई अशी पाय पसरून बसली आहे की साध्या माणसाचा श्वास घ्यायलाही जड जातंय. पगार तेवढाच, पण खर्च मात्र दर महिन्याला थोडं थोडं वाढतच चाललेला. घर चालवणाऱ्या माणसाला काय त्रास होतो हे त्यालाच माहीत असतं. वरती महावितरणचं दर महिन्याचं लाईटबिल (Electricity bill ) हातात आलं की डोक्यावर हातच पडतो एवढं कसं झालं? हेच शब्द तोंडातून निघतात. कारण घरात किती युनिट खर्च झाले, कोणत्या उपकरणाने किती वीज खाल्ली… हे सर्वसामान्य माणसाला सहज कळतच नाही. अनेक लोक म्हणतात, आपण एवढी वीज वापरलीच नाही तरी बिल का वाढतंय? आणि खरंच, गेल्या काही वर्षांत लाईट बिलात जाणवण्याजोगी वाढ झाल्यामुळे लोकांची बचत अक्षरशः करपून जातेय. पण अजूनही वेळ गेलेली नाही; घरात आपण काही छोट्या-छोट्या गोष्टी केल्या तर लाईट बिल अगदी सहज कमी करता येतं… महिन्याला 200-300 तर वर्षभरात 3-4 हजार वाचवणं काहीच मोठं नाही. महागाईच्या या काळात एवढी बचत म्हणजे मोठंच हलकं वाटतं घर चालवणाऱ्या कुठल्याही कुटुंबाला.
युनिट म्हणजे नक्की काय? (सहज समजेल अशा भाषेत)
आपण महावितरणचं बिल हातात घेतो तेव्हा “युनिट” नावाचे आकडे दिसतात, पण त्याचा अर्थ अनेकांना कळत नाही. सोपं उदाहरण 1 युनिट = 1 किलोवॅट ऊर्जा 1 तास वापरणं. म्हणजेच 1000 वॅटचं काही उपकरण एक तास चाललं तर 1 युनिट झालं. उदाहरणचं बोलावं तर, 50 वॅटचा बल्ब 20 तास चालवल्यावर 1 युनिट होते. घरातल्या उपकरणावर वॅटेज लिहिलेलं असतं. त्यावरून महिन्याचं युनिट आणि अंदाजे बिल सहज काढता येतं.
👉 मग बिल कमी कसं करायचं? लोकांना न कळणाऱ्या पण प्रचंड फायदेशीर 5 सवयी
भाऊ, या गोष्टींनी लोकांचं बिल अक्षरशः 20–30% कमी होतं. पण कोणी पद्धतशीर पाळत नाही म्हणून फायदा दिसत नाही.
1) 5-स्टार उपकरणांचा वापर : सुरुवातीला महाग पण वर्षभरात दुप्पट बचत घरात अजूनही जुन्या उपकरणांनी चालताय का? मग बिल कमी होणारच नाही. फ्रिज, एसी, वॉशिंग मशीन, मोटर—हे सर्व 5 स्टार असले की वीज 30-40% कमी खर्च होते. तज्ज्ञही सांगतात की वन-स्टार, टू-स्टार उपकरणं वीज अक्षरशः पिऊन टाकतात.
2) एलईडी बल्ब : घरचं 80% बिल कमी करण्याची सुरूवात इथूनच अजूनही कोणाच्या घरी 60W किंवा 100W चे बसलेले जुने बल्ब असतील तर समजून जा…
ओव्हरबिलिंग इथूनच होतं! एलईडी बल्ब 80% वीज वाचवतात. दिवसा नैसर्गिक प्रकाश, रात्री एलईडी इतकं केलं तरी महिन्याला फरक जाणवतो.
3) उपकरणांचा प्लग काढणं : लोक हसतात पण हेच बिल जास्त करतेटीव्ही बंद केला, पण प्लग लागलाय…
चार्जर बोर्डमध्ये लावलेत पण फोन काढलाय…मायक्रोवेव्ह बंद आहे पण स्विच ऑ लोक म्हणतात, यात काय होतं? पण सत्य असं की ही उपकरणं बंद असतानाही वीज खातच राहतात. याला “स्टँडबाय पॉवर लॉस” म्हणतात आणि महिन्याला 50–100 रुपये सहज जातात.
4) एसी 24–26°C वर : यापेक्षा कमी टेंप ठेवलं की बिल दुप्पट एसी वापरणाऱ्यांसाठी हा सगळ्यात उपयुक्त नियम. टेंप 18–20 केलं की एसी खूप मेहनत करतो आणि युनिट झपाट्याने वाढतात. 24–26°C हा गोल्डन रेंज. आरामही मिळतो आणि बिलही नियंत्रणात राहतं.
5 दिवसा नैसर्गिक प्रकाश : सर्वात स्वस्त उपाय पण लोक दुर्लक्ष करतात दिवसा पडदे उघडे ठेवणे, खिडक्या खुल्या ठेवणे, अनावश्यक दिवे बंद ठेवणे ही अगदी सोपी सवय आहे पण यामुळे बिल किती कमी होतं हे पाहिलं तर लोक थक्कच होतात. आपण नुसतं विचार करतो, “काय फरक पडणार आहे?” पण प्रत्यक्षात महिन्याला 100–150 रुपये वाचतात.
