Aadhaar Card Photo Update : आपल्या सर्वांचं एक ओळखीचा पुरावा आता आधार कार्ड (Aadhar card) झाल आहे. प्रत्येक सरकारी कामात असो किंवा खाजगी कामात असो किंवा इतर कुठेही असो आपल्याला आधार कार्ड हे लागतच. आधार कार्ड शिवाय आता कुठलेही काम होत नाही. आधार कार्ड हे आता एक महत्त्वाचे दस्तावेज बनले आहेत. परंतु हेच आधार कार्ड वापरत असताना यावरती होणाऱ्या अनेक चुका सर्वांना महागात पडतात. यामध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख अपडेट किंवा मोबाईल नंबर लिंक नसणे. त्यामुळे अनेक समस्यांना पुढे जावा लागते. तर कधी आधार कार्ड वरचा फोटो काळा येतो आणि यामुळे आपल्याला आधार केंद्रात जावं लागतं. फोटो हा बायोमेट्रिक डेटा चा भाग आहे, आणि त्यासाठी प्रत्यक्ष वेरिफिकेशन आवश्यक असतं. मग चला, तुमच्या आधार कार्ड वरील फोटो अपडेट करण्याची संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया. Aadhaar Card Photo Update
या पद्धतीने करा आधार कार्ड अपडेट
- सर्वात प्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जा. तिथे आधार एनरोलमेंट/अपडेट फॉर्म डाउनलोड करा. जर ऑनलाईन घेणे शक्य होत नसेल तर आधार कार्ड केंद्र मधून हा फॉर्म सहज मिळू शकतो.
- त्यानंतर फॉर्ममध्ये तुमचं नाव, आधार नंबर आणि इतर आवश्यक असलेली माहिती व्यवस्थित भरा. ओळखपत्र, त्याचा पुरावा आणि इतर माहिती सोबत जोडा.
- फॉर्म भरून नजीकच्या आधार सेवा केंद्रात जा. केंद्र कुठे आहे हे शोधण्यासाठी UIDAI च्या अपॉइंटमेंट पेजवर तपासा.
- तिथे उपस्थित असलेले आधार एक्झिक्युटिव्ह तुमचे फिंगरप्रिंट्स, डोळ्यांची स्कॅनिंग आणि इतर माहिती बायोमेट्रिक पद्धतीने पडताळणी करतील.
- व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर ते तुमच्या नवीन फोटो क्लिक करतील, जो थेट UIDAI डेटाबेस मध्ये सेव होईल.
- या प्रक्रियेसाठी जीएसटी सह ₹100 फी भरावी लागते. की भरल्यानंतर तुम्हाला पावती आणि URN मिळेल. हा नंबर अपडेट स्टेटस ट्रॅक करण्यासाठी महत्त्वाचा आहे.
- UIDAI नुसार आधार कार्ड वरील बदलांना कमाल 90 दिवस लागू शकतात. URN नंबर वापरून तुम्ही वेबसाईटवरून स्टेटस पाहू शकता. बदल झाल्यावर आधार कार्ड ऑनलाइन डाउनलोड करा किंवा केंद्रातून प्रिंट काढा.
(नवनवीन अपडेट साठी आम्हाला फॉलो करत चला जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल.)
हे पण वाचा | आधार अपडेटसाठी नवीन नियम लागू! आता आधार अपडेट करण्यासाठी लागतील ‘ही’ कागदपत्रे..