Aadhaar Card Update | आधार कार्डधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेले आहे. जर तुम्ही देखील तुमच्या आधार कार्डवरचे नाव बदलण्याचा विचार करताय, परंतु त्यासाठी तुम्हाला सेवा सेतू केंद्रामध्ये जावा लागत असेल तरी बातमी नक्की वाचा. कारण आता यापुढे तुम्हाला आधार कार्ड वरचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर किंवा जन्मतारीख बदलायची वेळ आली तर घरबसल्या तुम्ही हे काम करू शकता. या आधी तुम्हाला आधार कार्ड सेतू केंद्रामध्ये रांगेत उभारावा लागायचं चकरा मारावा लागायच्या आता कशा पद्धतीने आपण हे करू शकतो पहा. Aadhaar Card Update
आता UIDAI लवकरच एक नवा इ- आधार मोबाईल ॲप घेऊन येतोय आणि त्यावर घरबसल्या काही मिनिटात हे सगळं अपडेट करता येणार आहे. या ॲपमध्ये फेस आयडी, AI व्हेरिफिकेशन आणि क्यूआर कोड आधारित डिजिटल आयडेंटी अशी भन्नाट वैशिष्ट्य आहे. म्हणजे पासवर्ड, ओटीपी टाकत बसायचं त्रास संपलाय, तुमचं चेहरा तुमचं लॉगिन होणार. फोटोकॉपी घेऊन फिरायची गरज नाही, कारण ॲप मधून डिजिटल किंवा मास्क केलेला आधार तुम्ही कुठेही शेअर करू शकता.
सगळ्यात मोठं म्हणजे आता फॉर्म भरायचा, कागदपत्र देऊन वेळ घालवायचा हा त्रास संपणार. नाव बदलायचं, पत्ता दुरुस्त करायचा, मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे, हे सगळे फक्त दोन-चार टप्प्यांमध्ये होईल. फक्त बायोमेट्रिक अपडेट करायची वेळ आली तर केंद्रतच जावं लागेल. बाकी सर्व बदल नोव्हेंबर 2025 पासून थेट ॲप मधून होणार आहेत.
याचा फायदा ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे कारण गावोगावी अजूनही आधार केंद्र नाहीत. त्यामुळे लोकांना शहरात जावं लागतं दिवस खराब होतो खर्च होतो. मात्र आता मोबाईल वरती हे ॲप डाऊनलोड करून त्यांना घरात बसून आपला आधार कार्ड अपडेट करता येणार आहे.
आजवर आधार कार्ड अपडेट म्हणजे डोक्याला ताप असं वाटायचं, पण आता UIDAI च्या या नव्या ॲपमुळे सगळे सोप्प, जलद आणि सुरक्षित होणार आहे. लोकांचं कष्ट वाचणार, वेळ वाचणार आणि आधार कार्ड खरंच डिजिटल जगा सारखा वापरायला मिळणार.
हे पण वाचा | Aadhar Card Update: आधार कार्डच्या नियमात मोठ्या बदल! पॅन कार्ड, रेशन कार्डधारकांना ‘हे’ करावे लागणार..