लग्नानंतर आधार कार्ड वरील नाव आणि पत्ता कसा बदलावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया..


Aadhaar Card Update: आधार कार्ड प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा कागदपत्र आहे. शाळेतील मुलांचे प्रवेश करण्यापासून बँकेत खाते उघडण्यापर्यंत किंवा शासकीय योजनेचा लाभ घेण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी आधार क्रमांक महत्त्वाचा आहे. त्यामुळेच यात जर काही माहिती बदलायची असेल तर ती वेळेत अपडेट करणे फार महत्त्वाचे ठरते. लग्नानंतर अनेक महिलांना आपल्या नावामध्ये बदल करावा लागतो. नव्या घराचा पत्ता आणि आधार कार्ड नवऱ्याचे नाव बदलावे लागते. UIDAI ने यासाठी अगदी सोपी प्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने तुमचे आधार अपडेट करू शकता.

आधार कार्ड मधील नाव कसे बदलावे?

लग्नानंतर आधार कार्ड वरील नाव बदलणे ही सामान्य प्रक्रिया आहे. उदाहरणार्थ स्वाती विघ्नेश देशमुख लग्नानंतर या नावांमध्ये बदल करून स्वाती सुरेश कुलकर्णी असे नाव करावा लागू शकते. तर यासाठी फक्त काही आवश्यक कागदपत्रासह अर्ज करावा लागतो. Aadhaar Card Update

ऑफलाइन पद्धत:

  • सर्वप्रथम आपल्या जवळील आधार केंद्राला भेट द्या.
  • तिथे उपलब्ध असलेला आधार अपडेट फॉर्म भरा.
  • फॉर्म सोबत तुमचे विवाह प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
  • काही वेळा आधार अपडेट करण्यासाठी पतीच्या आधार कार्डची झेरॉक्स देखील मागितली जाऊ शकते.
  • नाव बदलण्यासाठी पन्नास रुपये शुल्क आकारला जातो.
  • प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला URN नंबर मिळतो ज्याद्वारे तुम्ही तुमचे आधार अपडेट स्टेटस पाहू शकता.
  • साधारण 90 दिवसात नाव अपडेट होऊन नवे आधार तयार होते.

हे पण वाचा| आता CIBIL स्कोअर नसला तरी कर्ज मिळणार! जाणून घ्या काय आहे नवीन नियम?

ऑनलाइन पद्धत:

  • UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करा.
  • My Aadhar मधील update demographics data या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचा आधार नंबर टाका आणि ओटीपी द्वारे लॉगिन करा.
  • Name पर्याय निवडून नवीन नाव प्रविष्ट करा.
  • विवाह प्रमाणपत्र आणि जोडीदाराच्या आधार कार्ड ची स्कॅन केलेली कॉपी अपलोड करा.
  • पन्नास रुपये शुल्क ऑनलाईन भरून अर्ज पूर्ण करा.
  • काही दिवसात तुमच्या आधारावर नवे नाव अपडेट झालेले दिसेल.

आधार कार्ड वरील पत्ता कसा बदलावा?

लग्नानंतर महिलांचे नवीन घर तिचा कायमचा पत्ता बनतो. अशावेळी हा पत्ता बदलणे महत्त्वाचे असते. पत्ता बदलण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे.

ऑफलाइन पद्धत:

  • जवळच्या आधार केंद्रावर जाऊन पत्ता बदलण्याचा फॉर्म भरा.
  • नवीन पत्त्याचा पुरावा म्हणून भाडेकरार वीज बिल पाणी बिल केव्हा तत्सम कागदपत्र द्या.
  • विवाह प्रमाणपत्र जोडल्यास प्रक्रिया अधिक सोपी आणि सुलभ होते.
  • URN क्रमांक मिळतो ज्याद्वारे तुम्ही तुमचे स्टेटस तपासू शकता.
  • साधारण 90 दिवसात पत्ता अपडेट केला जातो

ऑनलाइन पद्धत:.

  • UIDAI वेबसाईटला भेट द्या.
  • Update demographics data मध्ये address पर्याय निवडा.
  • नवीन पत्ता प्रविष्ट करून त्यात पुरावा अपलोड करा.
  • विवाह प्रमाणपत्राची स्कॅन कॉपी ही जोडू शकता.
  • पन्नास रुपये शुल्क भरून प्रक्रिया पूर्ण करा.
  • काही दिवसानंतर तुमचा आधार कार्ड वरील पत्ता अपडेट होईल.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!