तुमच्या आधार कार्डमध्ये नाव, मोबाईल नंबर आणि पत्ता किती वेळा बदलता येतो? जाणून घ्या सविस्तर

Aadhaar Card update rules: आधार कार्ड प्रत्येकाच्या जीवनाचा अतिशय महत्त्वाचा भाग बनला आहे. बँकेत खाते उघडण्यापासून शिष्यवृत्तीचा अर्ज अर्ज करण्यासाठी शाळेत प्रवेश घेण्यासाठी किंवा शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वत्र आधार कार्ड अतिशय आवश्यक आहे. पण अनेक वेळा आपल्या आधार कार्ड मध्ये चुकीचे नाव, मोबाईल नंबर किंवा पत्ता नोंदवला जातो. अशावेळी त्यातून अडचणी निर्माण होऊ शकतात. मात्र काळजी करू नका कारण UIDAI ने नागरिकांना आपली माहिती सुधारण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पण यामध्ये काही मर्यादा आणि नियम ठेवण्यात आले आहेत. चला तर जाणून घेऊया नेमकं काय बदल किती वेळा करता येतो आणि त्यासाठी काय आवश्यक आहे?

मोबाईल नंबर अपडेट करणे

तुम्ही मोबाईल नंबर हवे तितक्या वेळा बदलू शकता. कारण मोबाईल नंबर बदलणे हे नेहमीच आवश्यक असते. आज एखादा मोबाईल नंबर बंद झाला किंवा हरला तर उद्या दुसरा मोबाईल नंबर तुम्ही आधार कार्ड सोबत लिंक करू शकता. त्यामुळे UIDAI ने यावर कोणतीही मर्यादा घातली नाही. मात्र मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी आधार सेवा केंद्रात जाऊन संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

हे पण वाचा| राज्यात सोयाबीनला किती मिळतोय दर? जाणून घ्या आजचा सोयाबीन बाजार भाव

नाव अपडेट करणे

आधार कार्ड मध्ये नाव बदलण्याची मर्यादा खूप महत्त्वाची आहे. UIDAI ने फक्त दोन वेळा नाव सुधारण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे स्पेलिंग ची चूक असेल, विवाहानंतर आडनाव बदलायचे असेल किंवा इतर कारण असेल तर योग्य कागदपत्रासह बदल करता येतो. पॅन कार्ड पासपोर्ट विवाह प्रमाणपत्र अशी कागदपत्रे दाखवावी लागतात. नाव बदलण्यासाठी फक्त दोनच वेळेची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे नाव बदलताना सर्व माहिती व्यवस्थित तपासणी आवश्यक आहे

जन्मतारीख अपडेट करणे

आधार कार्ड मध्ये जन्मतारीख ची अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. आधार मध्ये जन्मतारीख फक्त एकच वेळा बदलता येते. त्यामुळे अर्ज करतानाच योग्य माहिती लिहिणे गरजेचे आहे. जर चुकून चुकीची जन्मतारीख नोंदवली गेली असेल तर जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा इतर अधिकृत कागदपत्र सादर करून ते तुम्ही सुधारू शकता. UIDAI ने याबाबतीत विशेष कडक नियम काढले आहेत.

पत्ता अपडेट करणे

नोकरी, व्यवसाय किंवा इतर काही कारणामुळे पत्ता बदलत राहतो. म्हणूनच UIDAI ने पत्ता अपडेट करण्यासाठी कोणतीही मर्यादा ठेवली नाही. पत्ता अपडेट करण्यासाठी वीज बिल भाडे करार बँक स्टेटमेंट यासारखे पुरावे देखील आधार कार्ड वरील पत्ता बदलण्यासाठी उपयोगी ठरतात. Aadhaar Card update rules

आधार कार्ड कुठे आणि कसे अपडेट करावे?

  • ऑनलाइन: माय आधार पोर्टलवर नाव, जन्मतारीख, पत्ता, लिंग इत्यादी बदल तुम्ही करू शकतात.
  • ऑफलाइन: आधार सेवा केंद्रात जाऊन मोबाईल नंबर बायोमेट्रिक माहिती अपडेट करू शकता.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!