आधार कार्ड अपडेट संदर्भात मोठा निर्णय! आधार कार्डबायोमेट्रिक अपडेटसाठी शुल्क आकारला जाणार नाही

Aadhar Card New Update: देशातील प्रत्येक नागरिकांसाठी आधार कार्ड हा अत्यंत महत्त्वाचा कागदपत्र बनला आहे. बँक खाते उघडणे असो शाळेत कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असो किंवा सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असो आधार कार्ड शिवाय कोणतेच काम शक्य होत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने वेळोवेळी त्यात बदल आणि सुधार करण्यासाठी सवलती दिल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार लहान मुले आणि किशोरवयीन मुलांना आधार नोंदणी किंवा बायोमेट्रिक अपडेट साठी कोणताही शुल्क द्यावा लागणार नाही.

आधी किती शुल्क आकारला जायचा?

आतापर्यंत नवीन नोंदणी किंवा बायोमेट्रिक अपडेट साठी पन्नास रुपयांचा शुल्क आकाराला जात होता. अनेक पालकांना मुलांचे आधार अपडेट करताना हे शुल्क द्यावा लागत असे मात्र आता सरकारने यावरचा हा शुल्क कमी केला आहे.

किती वयापर्यंत शुल्क आकारला जाणार नाही?

सरकारने जारी केलेल्या नियमानुसार पाच ते सात आणि पंधरा ते सतरा वर्ष वयोगटातील मुलांना आधार अपडेट करण्यासाठी कोणताही शुल्क लागणार नाही. या वयोगटातील सर्व मुलांना बायोमेट्रिक अपडेट अनिवार्य करण्यात आले असून आता त्यांना अपडेट करण्यासाठी शुल्क लागणार नाही.

हे पण वाचा| कर्जमाफीबाबत सर्वात मोठी बातमी! ‘या’ शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावीच लागणार? मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

बायोमेट्रिक अपडेट महत्त्वाचे आहे का?

लहान मुलाचे फिंगरप्रिंट्स आणि आयरिस डाटा जसे वय वाढते तसे बदलतो. त्यामुळे त्यांचा आधार डेटा अचूक रावा यासाठी बायोमेट्रिक अपडेट आवश्यक करण्यात आले आहे. अनेकदा शाळा, कॉलेज प्रवेशापासून शिष्यवृत्ती, बँक खाते उघडणे किंवा सरकारी योजनेचा लाभ घेण्यापर्यंत मुलाचे आधार कार्ड आवश्यक असते. त्यामुळे हे वेळेत अपडेट ठेवणे महत्त्वाचे ठरते. Aadhar Card New Update

आधार बायोमेट्रिक अपडेट कसे करावे?

  • सर्वप्रथम जवळील आधार केंद्रावर भेट द्या.
  • UIDAI चा अधिकृत वेबसाईटवर जवळचे केंद्र शोधता येते.
  • केंद्रातून नोंदणी/अपडेट फॉर्म मिळवा आणि तो नीट भरा.
  • फॉर्म सबमिट करताना बायोमेट्रिक डेटा (फिंगरप्रिंट स्कॅन, आयरिस स्कॅन) देणे महत्त्वाचे आहे.
  • केंद्र ऑपरेटर तुमचा डेटा नोंदवून प्रक्रिया पूर्ण करेल.

सरकारच्या या नवीन निर्णयामुळे लाखो पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आधी प्रत्येक अपडेट साठी शुल्क द्यावा लागत होता. विशेषता ग्रामीण भागात अनेक गोरगरीब कुटुंबांना हा शुल्क परवडत नव्हता. पण आता ही अडचण दूर झाली आहे. सरकारचा हा निर्णय सर्वसामान्य कुटुंबीयांना दिलासा देणारा ठरत आहे. आधार हा कागदपत्र जितका महत्त्वाचा आहे तितकाच त्यातील माहितीची अचूकता ठेवणं महत्त्वाचं आहे. मुलांच्या भविष्यात त्यांना कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागू नये म्हणून सर्व डेटा व्यवस्थित अपडेट ठेवा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “आधार कार्ड अपडेट संदर्भात मोठा निर्णय! आधार कार्डबायोमेट्रिक अपडेटसाठी शुल्क आकारला जाणार नाही”

Leave a Comment

error: Content is protected !!