Aadhar Card Update: आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा कागदपत्र आहे. ज्या नागरिकांकडे आधार कार्ड आहे तोच भारतीय नागरिक आहे असं समजलं जातं. कोणत्याही सरकारी कामासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी, गॅस सबसिडी मिळवण्यासाठी, सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. आपले आधार कार्ड वेळेत अपडेट ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. सरकारच्या नियमानुसार दहा वर्षातून एकदा तरी आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आधार कार्ड मध्ये काही चूक झाली असेल तर ती सुधारण्यासाठी आता लोकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. UIDAI ने नवीन शुल्कदर जाहीर केला आहे. हा दर 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू करण्यात आला आहे. या नवीन बदलामुळे सर्वसामान्य खिशावर याचा थेट परिणाम होणार आहे.
आधार कार्ड अपडेट करण्यासाठी किती शुल्क द्यावे लागणार? (How much will be charged to update Aadhaar card)
आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पूर्वी 50 रुपये ते शंभर रुपयापर्यंत शुल्क आकारला जात होता. मात्र आता यामध्ये वाढ करून 75 रुपये ते 125 रुपये पर्यंत करण्यात आला आहे. म्हणजेच आधार कार्ड मध्ये साधं नाव पत्ता मोबाईल नंबर किंवा जन्मतारीख अपडेट करायचे असेल तर आता 75 रुपये द्यावे लागणार आहेत. त्याचबरोबर बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी 100 रुपयावरून थेट 125 रुपयापर्यंत वाढ झाली आहे.
UIDAI स्पष्ट केले आहे की, नवीन शुल्कदर 2028 पर्यंत वैद्य राहणार आहेत. मात्र 2028 नंतर म्हणजेच एक ऑक्टोबर 2028 ते 30 सप्टेंबर 2031 या कालावधीत पुन्हा एकदा शुल्क वाढवण्यात येणार असून त्यावेळी बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी 150 रुपये शुल्क आकारला जाऊ शकतो. नवीन शुल्क दरामुळे सर्वसामान्य माणसांच्या खिशावर याचा थेट परिणाम होताना दिसणार आहे.
हे पण वाचा| दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 10 तोळा सोनं 5,500 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन दर
लहान मुलांसाठी दिलासा (Aadhar card update for minor children)
आधार अपडेट करण्यासाठी दरवाढ करण्यात आली असली तरी लहान मुलांना मात्र दिलासा दिला आहे. पाच ते सात आणि पंधरा ते सतरा वयोगटातील लहान मुलांसाठी बायोमेट्रिक अपडेट साठी पैसे द्यावे लागणार नाही. UIDAI ने लहान मुलांना सवलत दिली आहे. सात ते पंधरा वर्षे वयोगटातील मुलांना 30 सप्टेंबर 2020 पर्यंत बायोमेट्रिक अपडेट पूर्णपणे मोफत दिल्या जाणार आहे. म्हणजेच पालकांना त्यासाठी पैसे द्यावे लागणार नाहीत.
कलर प्रिंट आणि ई केवायसी देखील महागणार (Aadhaar Card e KYC)
तुम्हाला आधार कार्डची कलर प्रिंट हवी असेल किंवा ई केवायसी करायचे असेल तर त्यासाठी देखील तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. 2025 ते 2018 या कालावधीत या सेवेचे शुल्क चाळीस रुपये ठेवण्यात आले होते मात्र 2028 नंतर ते पन्नास रुपये करण्यात येणार आहे.
घरबसल्या आधार अपडेट सेवा (Aadhar card update from home)
UIDAI ने नागरिकांच्या सोयीसाठी घरबसल्या आधार अपडेट करण्याचे सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे. मात्र यासाठी खर्च मोठ्या प्रमाणात करावा लागणार आहे. घरातल्या पहिल्या व्यक्तीसाठी या सेवेची शुल्क सातशे रुपये असेल. तर घरातील इतर सदस्यांना आधार अपडेट करण्यासाठी प्रत्येक वेळा 350 रुपये द्यावे लागतील. Aadhar Card Update
जर तुम्हाला देखील तुमचे आधार कार्ड अपडेट करायचे असेल तर आता पूर्वीप्रमाणे स्वस्तात होणार नाही. UIDAI च्या नवीन नियमानुसार सर्वसामान्य नागरिकांना पूर्वीपेक्षा जास्त खर्च लागणार आहे. मात्र 30 सप्टेंबर 2026 पर्यंत लहान मुलांना ही सुविधा मोफत उपलब्ध असणार आहे. आता आधार कार्ड अपडेट करताना प्रत्येकाने नवीन शुल्क दर लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

1 thought on “1 ऑक्टोबर पासून UIDAI चा नवीन निर्णय! आता आधार कार्ड अपडेटसाठी जास्त पैसे द्यावे लागणार; जाणून घ्या सविस्तर”