सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी! AAI मध्ये 976 पदांची भरती; पगार मिळणार 1.40 लाख रुपये; जाणून घ्या सविस्तर माहिती


AAI Recruitment News : सरकारी नोकरी करण्याचं स्वप्न आहे तरी बातमी तुमच्यासाठी एक महत्त्वाची ठरणार आहे. कारण एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया ने देशभरातील तरुणांसाठी थेट भरतीची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. या पद भरतीमध्ये ज्युनिअर एक्झिक्यूटिव्ह या पदांसाठी तब्बल 976 पदांची भरती जाहीर केली असून ही संस्था स्थिर पगार, सरकारी सुविधांसह उत्तम करिअर साठी फायदेशीर आहे. जर तुम्ही देखील सरकारी नोकरी करण्याचा विचार करताय तर ही संधी तुमच्यासाठी मोठी असणार आहे त्यासाठी अर्ज कसा करायचा याची माहिती खाली दिलेली आहे. AAI Recruitment News

अर्ज आणि महत्त्वाच्या तारखा

या पद भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची तारीख 28 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार आहे 27 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी थेट AAI च्या अधिकृत वेबसाईट AAI.aero ला भेट देऊन अर्ज करावा.

पदनिहाय जागा

  • ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (आर्किटेक्चर) – 11 पदे
  • ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (अभियंता-सिव्हिल) – 199 पदे
  • ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (अभियांत्रिकी-इलेक्ट्रिकल) -208 पदे
  • ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (इलेक्ट्रॉनिक्स) – 527 पदे
  • ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (माहिती तंत्रज्ञान) – 31 पदे एकूण – 976 पदे

(या भरतीच्या अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा त्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन पीडीएफ डाउनलोड करा.)

शैक्षणिक पात्रता

उमेदवाराकडे आर्किटेक्चर, सिविल/ इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी किंवा IT मधील बॅचलर पदवी असावी. तसेच GATE परीक्षेचे वैद्य गुणपत्र असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : या पद भरती मध्ये कमाल वय 27 वर्ष (27 सप्टेंबर 2025 रोजी). अनुसूचित जाती/ जमाती पाच वर्ष सूट. ओबीसी तीन वर्षे सूट. दिव्यांग दहा वर्ष सूट.

पगार आणि सुविधा

निवड झालेल्या उमेदवारांना 40,000 ते एक लाख 40 हजार इतका मासिक पगार मिळणार आहे. याशिवाय वैद्यकीय, पेन्शन, प्रवास भत्ता अशा इतर सुविधा देखील मिळतील. (यासाठी सविस्तर पीडीएफ जाहिरात वाचा)

अर्ज शुल्क : सामान्य, ओबीसी, इडब्ल्यूएस : ₹300 रुपये तर इतर SC/ ST/ महिला उमेदवार शुल्क नाही. शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावा लागणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत :

अर्ज करण्याची पद्धती ऑनलाईन असणार आहे त्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून अर्ज काढता येऊ शकतो इथे गेल्यानंतर करियर विभागात जाऊन भरतीची लिंक निवडा. अर्ज फॉर्म पूर्ण भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. अर्ज शुल्क जमा करा. सर्व तपशील तपासून पहा आणि मग फॉर्म भरा फॉर्म भरल्याच्या नंतर प्रिंट काढून ठेवा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!