Agriculture News E-Pik Survey : शेतकऱ्यांनो जर तुम्ही तुमच्या पिकाचे ई – पीक पाहणी केली नसेल तर तुम्हाला अनुदान, पिक विमा, तुमच्या शेतीचे काही नुकसान झाल्यास आर्थिक मदत मिळणार नाही त्यामुळे ही बातमी नक्की वाचा. कारण सरकारकडून एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. शेतकऱ्यांसाठी सरकारने सुरू केलेल्या ई – पीक सर्वे मध्ये शेतकऱ्याकडून जोरदार प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. खरीप हंगामात पिकाची नोंदणी करण्यासाठी एक ऑगस्टपासून ही मोहीम सुरू झाली असून आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. 14 सप्टेंबर ही शेवट तारीख असून याआधी शेतकऱ्यांनी नोंदणी केली नाही तर पिक विमा अनुदान आणि इतर शासकीय योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही असा थेट इशारा महसूल विभागाने दिलेला आहे. मग कसं करणार याची माहिती सविस्तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. Agriculture News E-Pik Survey
मोबाईल वरूनच नोंदणी करा?
आता शेतकरी स्वतः मोबाईल ॲपवरून किंवा गावात नेमलेल्या सहाय्यकांच्या मदतीने सातबारावर आपली पीक नोंदवू शकतात. यासाठी फक्त आधार क्रमांकाशी लिंक असलेला मोबाईल नंबर लागणार आहे. पिकाचे क्षेत्र, पेरणी ची तारीख, बांधावरील झाड (आंबा, पिंपळ, कडुलिंब) यांचा तपशील भरायचा आहे आणि त्याचे फोटो अपलोड करायचे आहे. चालू पडीक किंवा कायम पडिक क्षेत्राची नोंदणी करावी लागणार आहे.
यावर्षीचा नवीन नियम काय?
नोंदणी करत असताना पिकाच्या शेतीच्या सीमेजवळ 50 मीटर परिघातील दोन फोटो अपलोड करणे बंधनकारक केले आहे. चुकीची नोंद झाली तर काळजी नको शेतकऱ्यांना 48 तासाच्या आत दुरुस्ती करण्याची संधी मिळणार आहे. हे दोन नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत.
या आधी काही जिल्ह्यांमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला होता. पण आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये E- Pik पाहणी प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. या मोहिमेमुळे प्रशासनाला पिकांची अचूक माहिती मिळेल आणि योजनेच नियोजन करणे सोपे होईल.
या पद्धतीने नोंदणी करा
सर्वात प्रथम प्लेस्टोर वरून हे अँप डाऊनलोड करा.
आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकून लॉगिन करा.
पिकाचे क्षेत्र, पेरणीची तारीख, झाडांची माहिती भरा.
50 मीटरच्या आतून दोन फोटो काढून अपलोड करा.
काही त्रुटी आढळल्यास 48 तासांमध्ये सुधारणा करा. गावात नेमलेले सहाय्यक शेतकऱ्यांना ॲप वापरून माहिती भरणारे फोटो अपलोड करणे शिकवतील.
Read this too : ई-पीक पाहणीचं नवीन मोबाईल ॲप आलं! पीक नोंदणी उशिरा केली तर नुकसान तुमचंच..