Astrology Today : आपल्या आयुष्यात सुख, प्रेम आणि पैसा या तिन्ही गोष्टींचं मोठं स्थान आहे. कोणत्याही कुटुंबात पैसा आला की घर चालतं, सुख आलं की मन आनंदी राहतं आणि प्रेम आलं की जीवनाला खरी ओळख मिळते. असंच काहीसं ९ सप्टेंबर २०२५ रोजी घडणार आहे. कारण या दिवशी पितृपक्षाच्या काळात शुक्र ग्रह अश्लेषा नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात प्रवेश करणार आहे. शुक्र हा ग्रह प्रेम, वैवाहिक जीवन, ऐशआराम आणि कला यांचा कारक मानला जातो. त्यामुळे याचा थेट परिणाम सर्व राशींवर होणार आहे, मात्र खासकरून तीन राशींवर याचा मोठा आशीर्वाद लाभणार आहे. या लोकांच्या आयुष्यात पैसा, प्रेम आणि समाधान या तिन्ही गोष्टींचं एकत्र आगमन होणार असल्याचा ज्योतिषांचा दावा आहे.
मिथुन राशी (Gemini) : नवे मार्ग खुलणार
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ सुवर्णसंधी घेऊन येतोय. शुक्र ग्रह त्यांच्या जीवनात पैशाचे नवे मार्ग उघडेल. आजवर मेहनत करूनही पैसा हाताशी येत नसेल तर आता त्याला खऱ्या अर्थाने गती मिळेल. घरात समाधान आणि आनंदाचं वातावरण राहील, कुटुंबीयांमध्ये सौख्य वाढेल. प्रेमसंबंध प्रकट होऊ शकतात आणि विवाहासारख्या शुभ कार्याच्या चर्चाही घराघरांत सुरू होऊ शकतात. विशेष म्हणजे कला, लेखन, संगीत किंवा सर्जनशील काम करणाऱ्यांसाठी हा काळ वरदान ठरेल. त्यांच्या कर्तृत्वाला मान्यता मिळेल आणि नावाबरोबर पैसा देखील मिळेल.
कन्या राशी (Virgo ) : अचानक धनप्राप्तीची शक्यता
कन्या राशीच्या जातकांसाठी शुक्राचं गोचर अत्यंत लाभदायी ठरणार आहे. त्यांच्या आयुष्यात अचानक धनप्राप्तीचे मार्ग खुलतील. नोकरीत पदोन्नती, व्यवसायात विस्तार आणि मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे. आतापर्यंत अडकलेली सरकारी कामं पूर्ण होतील. मित्रमंडळी आणि नातेवाईक यांच्या मदतीने महत्त्वाची कामं सोपी होतील. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे, अन्यथा आलेला पैसा गेला तरी कळणार नाही. आरोग्याबाबत थोडी काळजी घ्यायला हवी. पण एकंदरीत, कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ जीवनात स्थैर्य आणि समाधान देणारा आहे.
वृश्चिक राशी (Scorpio) : भाग्य उजळणार
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ विशेष शुभ ठरेल कारण शुक्र भाग्यस्थानातून भ्रमण करणार आहे. त्यामुळे नोकरी, व्यवसाय आणि सरकारी कामांत मोठं यश मिळेल. पैशाची कमतरता जाणवणार नाही आणि अचानक मोठी रक्कम हाती येऊ शकते. धार्मिक प्रवासाचे योग तयार होतील, कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवता येतील. कला आणि सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्यांना नाव, कीर्ती आणि पैसा मिळेल. जणू ग्रहांनी हात धरून पुढे नेल्यासारखं जीवनात सर्व क्षेत्रांत प्रगती होईल.
या तिन्ही राशींना शुक्र ग्रहाचं हे गोचर वरदान ठरणार आहे. पैसा, प्रेम आणि आनंदाचं मिश्रण त्यांच्या जीवनात नव्या सुरुवातीचं दार उघडेल. मात्र, बाकीच्या राशींनीही काळजी करण्याची गरज नाही कारण ग्रहांचा बदल सगळ्यांवर परिणाम करतोच, फक्त काहींवर जास्त ठळकपणे जाणवतो.
हे पण वाचा | 144 वर्षानंतर तो योग जुळून आला; या राशींचे भविष्य उजळणार