Astrology Today | माणसाच्या आयुष्यातील बदल हे केवळ त्याच्या मेहनतीवर, प्रयत्नांवर किंवा नशिबावरच अवलंबून नसतात, तर ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीसुद्धा त्याला मोठ्या प्रमाणात प्रभावित करतात असं शतकानुशतकांचं ज्योतिष सांगतं. राहू हा ग्रह तसा मायावी, गूढ आणि अनिश्चितता निर्माण करणारा म्हणून ओळखला जातो. पण त्याची स्थिती अनुकूल झाली तर तो जणू एखाद्या साध्या माणसाचं आयुष्यच बदलून टाकतो. Astrology Today
आता पंचांगानुसार पाहिलं तर, सध्या राहू पूर्वाभाद्रपद नक्षत्रात विराजमान आहे आणि तो इथेच २ डिसेंबर २०२५ पर्यंत राहणार आहे. त्यानंतरच तो शतभिषा नक्षत्रात प्रवेश करेल. म्हणजे पुढची तीन महिने हा ग्रह आपला प्रभाव या नक्षत्रातून दाखवणार आहे. आणि या काळात काही राशींसाठी हा बदल अक्षरशः सोन्याहून पिवळा ठरणार आहे.
मेष राशी(Aries): ध्येयपूर्तीचा काळ
मेष राशीच्या लोकांनो हा काळ तुमच्यासाठी खूप विशेष आहे. राहू तुमच्या बाजूला उभा आहे असं म्हणायला हरकत नाही. आतापर्यंत ज्या इच्छा मनात ठेवल्या होत्या त्या हळूहळू पूर्ण होऊ लागतील. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील दांपत्य जीवन सुखकर होईल. ज्या गोष्टींपासून तुम्ही घाबरत होता त्या आता तुम्ही सामोरं जाण्याची ताकद मिळवाल. शेतकरी असो वा नोकरी करणारे मेहनतीचं फळ या काळात नक्की मिळणार.
तूळ राशी(Libra): करिअर आणि नात्यांत नवा प्रकाश
तूळ राशीच्या लोकांसाठी तर हा काळ उत्सवाचा आहे. करिअरमध्ये नवीन दालने उघडतील, व्यवसायाला गती मिळेल. ज्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केलीय, त्यांना हवी ती संधी हाताशी येऊ शकते. मुलांकडून आनंदी वार्ता येईल कुटुंबात हसू-आनंद पसरेल. अजून अविवाहित असाल तर लग्नाच्या गाठी जोडल्या जातील. एक लक्षात ठेवा मेहनत कमी करू नका. कारण राहू संधी तर देईल पण त्याचा लाभ घेणं तुमच्यावर अवलंबून आहे.
कुंभ राशी(Aquarius): सुख, संपत्ती आणि समाधान
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी राहूचं हे नक्षत्र परिवर्तन अक्षरशः सुवर्णसंधी घेऊन आलंय. कुटुंबातले जुने वाद मिटतील, वातावरण प्रसन्न होईल. अडकलेले पैसे हातात येतील. नवीन प्रॉपर्टी वाहन खरेदी करण्याची वेळ येईल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल आणि बढतीची शक्यता प्रबळ आहे. धार्मिक ठिकाणी भेटी देतील मानसिक समाधान लाभेल. अचानक धनलाभ होईल आणि आर्थिक अडचणी दूर होतील.
(Disclaimer: वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही आणि अंधश्रद्धेला दुजारा देत नाही.)
हे पण वाचा | जगातील सगळ्यात भयानक साप! एका थेंबात 100 लोकांचा जीव जाऊ शकतो? वाचा सविस्तर माहिती