२०२६ मध्ये जगावर मोठं संकट? बाबा वेंगांची सर्वात मोठी भविष्यवाणी वाचून अंगावर काटा येईल


Baba Vanga 2026 Prediction : भविष्य सांगणारे बरेच लोक झाले पण बल्गेरियामधल्या एका अंध स्त्रीने केलेल्या भाकितांबद्दल जगभर चर्चा होते, त्या म्हणजेच बाबा (Baba Vanga) वेंगा. ‘बाल्कनची नॉस्ट्राडॅमस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महिलेचं १९९६ मध्ये निधन झालं असलं तरी त्यांनी केलेली भाकितं आजही जगाला हादरवतात. त्यांच्या काही गोष्टी खरी ठरल्याचं लोक मानतात, म्हणूनच त्यांच्या नावाने येणारी प्रत्येक भविष्यवाणी लोकांच्या मनात कुतूहल आणि भीती दोन्ही निर्माण करते. आता त्यांच्या २०२६ सालासाठीच्या भाकितांनी मात्र लोकांच्या छातीत धडधड वाढवली आहे, कारण त्यात नैसर्गिक आपत्ती, तिसरं महायुद्ध, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अगदी परग्रहवासीयांशी संपर्क अशा गोष्टींचा उल्लेख आहे.

वेंगांच्या भाकितांपैकी सर्वात पहिला मुद्दा म्हणजे भीषण नैसर्गिक आपत्ती. त्यांनी सांगितलं की २०२६ मध्ये जगाच्या जवळपास ७ ते ८ टक्के भागावर भयंकर भूकंप, प्रचंड ज्वालामुखी उद्रेक आणि हवामानातील विक्राळ बदलांचा तडाखा बसू शकतो. कुठे युरोपला तापमानाच्या विक्रमी लाटा झेलाव्या लागतील, कुठे कॅनडा-ऑस्ट्रेलियामध्ये जंगलातील आगी धुमसतील, तर पॅसिफिक रिंग ऑफ फायरमध्ये भूकंपीय हालचाली वाढतील, अशा घटनांची शक्यता त्यांनी दर्शवली होती. आज आपण पाहतोच की २०२५ मध्ये हवामान बिघडून किती मोठ्या आपत्ती घडल्या, त्यात त्यांच्या इशाऱ्याची छाया दिसून येते. म्हणजे जर खरंच त्यांचं भाकीत तंतोतंत खरं ठरलं तर २०२६ हे वर्ष पृथ्वीच्या नकाशावर काळं पान बनू शकतं.Baba Vanga 2026 Prediction

दुसरं मोठं भाकीत म्हणजे तिसऱ्या महायुद्धाची भीती. त्यांनी इशारा दिला की मोठ्या देशांमध्ये थेट सैनिकी संघर्ष होऊ शकतो. चीनकडून तैवानवर आक्रमण, रशिया आणि अमेरिकेत थेट युद्ध, मध्य पूर्व आणि दक्षिण आशियातील वाढता तणाव, या सगळ्यामुळे परिस्थिती बिघडू शकते. आज आपण बघतोय की छोट्या वादांवरून मोठे देश भिडतात, आणि वेंगांच्या म्हणण्यानुसार जर हे सर्व एकत्र आलं, तर जगाला एका भीषण युद्धाचा सामना करावा लागू शकतो. ही कल्पनाच अंगावर काटा आणणारी आहे.

वेंगांचं आणखी एक भाकीत म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI. त्यांनी सांगितलं की २०२६ हे वर्ष AI साठी एक टर्निंग पॉईंट ठरू शकतं. यंत्रं फक्त माणसांना मदत करणार नाहीत तर माणसांच्या हातातली मोठी कामं काढून घेतील, ज्यामुळे बेरोजगारी वाढेल, माणसाची भूमिका कमी होईल आणि नैतिक प्रश्न निर्माण होतील. आज आपण पाहतोय की २०२५ मध्ये AI झपाट्याने वाढतोय, तर मग २०२६ मध्ये त्याचं परिणाम किती मोठं असेल याचा विचार केला तरी काळजी वाटते.

सगळ्यात गूढ आणि धक्कादायक भाकीत म्हणजे परग्रहवासीयांशी संपर्क. त्यांनी सांगितलं होतं की नोव्हेंबर २०२६ मध्ये पृथ्वीवर पहिल्यांदाच परग्रहवासीयांचं आगमन होऊ शकतं. अगदी प्रचंड अंतराळयान पृथ्वीच्या वातावरणात येईल असं त्यांनी म्हटलं होतं. काही शास्त्रज्ञ या गोष्टींना दंतकथा मानतात पण काही संशोधक मात्र असं म्हणतात की अंतराळातून कृत्रिम वस्तू पृथ्वीच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे या भाकिताने चर्चांना आणखी खतपाणी घातलं आहे.

बाबा वेंगांची ही भाकितं खरी ठरली तर जगभर थरकाप उडेल, पण खरी नसली तरी यातून एक संदेश नक्की मिळतो की आपला ग्रह किती नाजूक आहे आणि जागतिक राजकारण, हवामान बदल, तंत्रज्ञान यामुळे आपलं भविष्य किती अनिश्चित आहे. म्हणूनच लोकं म्हणतात, वेंगांचं नाव ऐकलं की भीती आणि कुतूहल एकत्र डोकावून जातं.

( Disclaimer: वरी दिलेली बातमी सर्व प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे. याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही)

हे पण वाचा | 144 वर्षानंतर तो योग जुळून आला; या राशींचे भविष्य उजळणार

Leave a Comment

error: Content is protected !!