बांधकाम कामगारांच्या मुलांना मिळते शिष्यवृत्ती! आता शिक्षणासाठी मिळणार ₹5,000 ते ₹1,00,000 पर्यंत मदत..


Bandhkam Kamgar Scholarship Yojana: आपल्या गावात किंवा शहरात दररोज बांधकामे सुरू असतात. प्रदीप फुले रस्ते उंच इमारती या सगळ्यांच्या मागे दिवस-रात्र घाम गाळून कष्ट करणारे मेहनती बांधकाम कामगार असतो. या कामांमध्ये खूपच जास्त श्रम आहे. विट खडी डोक्यावर उचलणारा पावसात भिजत हातोडा मारणारा तसाच उन्हात भाजत कुटुंबासाठी कष्ट करणारा अशा कामगारांच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी सरकारची मोठी योजना समोर येत आहे. महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. ही योजना म्हणजे खऱ्या अर्थाने बांधकाम कामगारांच्या लेकरांसाठी सुवर्णसंधी आहे. कारण यातून लहान मुलांसाठी डॉक्टर इंजिनियर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे.

बांधकाम कामगारांच्या लेकरांना शिक्षणासाठी पैसे अभावी थांबावा लागू नये यासाठी महाराष्ट्र सरकारने 5000 ते तब्बल एक लाख रुपयापर्यंत शिष्यवृत्ती मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच पहिली ते मेडिकल इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ही योजना महाराष्ट्रात इमारत व इतर बांधकाम करणाऱ्या कल्याणकारी मंडळामार्फत राबवली जात आहे.

कोणाला किती मिळणार शिष्यवृत्ती?

  • इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 2500 रुपये
  • इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी पाच हजार रुपये
  • इयत्ता अकरावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी दहा हजार रुपये
  • पदवी शिक्षण प्रतिवर्षी वीस हजार रुपये
  • पदव्यूत्तर शिक्षण प्रतीवर्षी 25 हजार रुपये
  • अभियांत्रिकी प्रतिवर्षी 60000 रुपये
  • वैद्यकीय प्रतिवर्षी एक लाख रुपये
  • संगणक कोर्स : संपूर्ण शुल्क परत मिळेल.

हे पण वाचा| माेठी बातमी! पुरवठा विभागाकडून मोठी कारवाई; राज्यातील दीड कोटी लाभार्थींचे धान्य बंद..

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाची ओळखपत्र
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • रेशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • शाळा / कॉलेज फी पावती
  • बोनाफाईड प्रमाणपत्र
  • मागील वर्षाची गुणपत्रिका
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • चालू मोबाईल नंबर आणि पासपोर्ट साईज फोटो

कष्टाने पोट भरूनही शिक्षणासाठी पैसे जमवणं प्रत्येक बांधकाम कामगारांना जमत नाही. अनेकदा लेकरांना अभ्यासात हुशार असूनही पैसे अभावी शाळा सोडावी लागते. पण आता सरकारची ही योजना म्हणजे प्रत्येकासाठी खरोखरच दिलासा देणारी आहे. समजा बांधकाम कामगारांचे लेकरू उद्या इंजिनियर होऊन मोठाल्या इमारती बांधायला लागलं किंवा डॉक्टर बनून हजारोच्या जीवाचे संरक्षण करू लागले तर त्या आईबापांना किती आनंद होईल.

म्हणूनच जर तुम्ही बांधकाम कामगार असाल तर सरकारच्या या योजनेचा अवश्य लाभ घ्या. आपल्या लेकराच्या शिक्षणासाठी या शिष्यवतीला अर्ज करा. आज मिळालेली ही संधी उद्या तुमचे भविष्य सुधारण्यासाठी मदत करेल. Bandhkam Kamgar Scholarship Yojana

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “बांधकाम कामगारांच्या मुलांना मिळते शिष्यवृत्ती! आता शिक्षणासाठी मिळणार ₹5,000 ते ₹1,00,000 पर्यंत मदत..”

Leave a Comment

error: Content is protected !!