Bank of Baroda Job Recruitment : देशातील नामांकित आणि सरकारी बँक ऑफ बडोदा(Bank of Baroda) ही एक तरुणांसाठी एक महत्त्वाची संधी घेऊन आलेली आहे. जर तुम्ही देखील अशा सरकारी बँकेमध्ये नोकरी करण्याचा विचार करत असाल तर बँक ऑफ बडोदा अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. असिस्टंट मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, AVP अशा पदांसाठी भरती असून उमेदवारांना पाच वर्षाच्या करारपद्धतीवर नेमणूक मिळणार आहे. विशेष म्हणजे, कामगिरी समाधानकारक असल्यास हा करार आणखी पाच वर्षांसाठी वाढवला जाऊ शकतो. Bank of Baroda Job Recruitment
एकूण पदे : 330 यामध्ये फक्त असिस्टंट मॅनेजर MSME सेल्स या पदासाठी तब्बल 300 जागा आहेत. आरक्षणानुसार अजा 45, अज 22, इमाव 81, EWS 30, आणि खुला प्रवर्गासाठी 112 जागा आहेत.
शैक्षणिक पात्रता
एक जुलै 2025 रोजी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. पदवीधर, MBA किंवा PGDM असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. MSME फायनान्स किंवा IIBF L, NISM यांचे क्रेडिट संबंधित कोर्सचे सर्टिफिकेट असल्यास ते अधिक फायदेशीर ठरेल.
अनुभवाची अट: असेट सेल्समध्ये, विशेषता बँक, NBFC किंवा इतर वित्तीय संस्थेत किमान दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा: एक जुलै 2025 रोजी उमेदवाराचे वय 22 ते 32 वर्षाच्या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गाला शासन मान्यता सुट लागू आहे (यासाठी सविस्तर पीडीएफ जाहिरात वाचा.)
वेतन: उमेदवाराचे शैक्षणिक पात्रता, अनुभव व शेवटचे मिळालेले वेतन यावर आधारित पगार ठरवला जाणार आहे. (यासाठी पीडीएफ जाहिरात वाचा)
निवड प्रक्रिया : या पद भरतीसाठी निवड प्रक्रिया शैक्षणिक अहर्ता, अनुभव व पात्रतेनुसार उमेदवारांना मुलाखत किंवा इतर निवड प्रक्रियेसाठी बोलवले जाईल.
अर्ज कसा करावा : बँक ऑफ बडोदा च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या, त्यानंतर करिअर Section, Current Opportunity वर क्लिक करा. आवश्यक तपशील भरून फॉर्म सबमिट करा. शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2025 आहे.
How can feel the form directly it’s showing wrong information
Detailed information for this is given on the Bank of Baroda website. Check that all the information is correct while applying.