Bank of Maharashtra Jobs : जर तुम्ही देखील बँकेमध्ये नोकरी करण्याचा विचार करताय तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची ठरणार आहे कारण बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मोठी पद भरती निघाली असून पगार देखील भरभक्क मिळणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये थेट 500 जागांसाठी भरती जाहीर केलेली असून ग्रामीणच्या शहरी भागातील तरुणांसाठी यामध्ये अर्ज करता येणार आहे. ही भरती जनरल लिस्ट ऑफिसर (स्केल II) पदांसाठी आहे आणि यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा तब्बल ₹93,960 पर्यंत पगार मिळणार आहे. Bank of Maharashtra Jobs
अर्ज करण्याची महत्त्वाची तारीख : भरतीची ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख 13 ऑगस्ट 2025 पासून सुरू झालेली आहे. तर 30 ऑगस्ट 2025 ही शेवट अर्ज करण्याची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे ही संधी गमवू नका. (अधिक माहितीसाठी खालील दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा)
पात्रता काय आहे ?
कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून किमान 60% गुणांसह पदवी असणे आवश्यक किंवा चार्टर्ड अकाउंटंट असणे आवश्यक. वयोमर्यादा बावीस वर्षे ते 35 वर्षे सरकारी नियमानुसार राखीव वर्गांना सूट.
पगार किती मिळणार?
या पदावरती निवड झाल्या उमेदवारांना 64,820 रुपये ते 93 हजार 960 दर महा मासिक पगार मिळणार आहे. याशिवाय बँकेचे इतर सर्व फायदे आणि भत्ते देखील मिळणार आहेत. ज्यामुळे एकूण वार्षिक उत्पन्न लाखोंच्या घरामध्ये जाईल.
अर्ज फी : सामान्य/ OBC/EWS: ₹180 SC/ ST/ PWD : ₹118
अर्ज कसा कराल?
बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाईटवर जा. त्यानंतर करिअर विभाग निवडा. भरतीची जाहिरात वाचा आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक उघडा. सर्व माहिती योग्यरीत्या भरून आवश्यक कागदपत्र अपलोड करा. फी ऑनलाइन भरा आणि अर्ज सबमिट करा.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा