बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी! पगार मिळणार 94 हजार रुपये अर्ज, करण्याची प्रक्रिया जाणून घ्या


Bank of Maharashtra Jobs 2025 : बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याच स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आपल्या राज्यातल्या नामांकित बँक ऑफ महाराष्ट्रने नुकतीच एक जनरल लिस्ट ऑफिसर पदासाठी मोठी भरती जाहीर केलेली आहे. स्केल II आणि स्केल III या श्रेणीमध्ये मिळून तब्बल 500 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज प्रक्रिया 13 ऑगस्ट पासून सुरू झाली असून 30 ऑगस्ट 2025 ची शेवटची तारीख आहे. त्यामुळे अजून अडचण केलेल्या उमेदवारांसाठी आणखी संधी आहे आणि तुम्ही लगेच अर्ज करू शकता. Bank of Maharashtra Jobs 2025

भरती संपूर्ण देशभरातील तरुणांसाठी सुरू आहे म्हणजे महाराष्ट्र सोबत राज्यातील तरुण देखील यामध्ये अर्ज करू शकतात. कायमस्वरूपी आणि सन्माननीय नोकरीच स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची संधी आहे. साठी खालील प्रकारे पात्रता आणि वयोमर्यादा पाहून अर्ज करा.

वयोमर्यादा काय?

या पदासाठी अर्ज करताना उमेदवारीची वय 22 ते 35 वर्ष दरम्यान असणं गरजेचं आहे. मात्र, सरकारी नियमाप्रमाणे SC, ST,OBC आणि इतर राखीव गटांना वयात सूट दिली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता

कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी (60% गुणांसह) आवश्यक. तसेच चार्टर्ड अकाउंटंट ( CA) उमेदवार देखील अर्ज करू शकतात.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

अर्ज शुल्क किती?

जनरल, ओबीसी, पीडब्ल्यूडी उमेदवार 1180 रुपये तर एससी, एसटी, पीडब्ल्यूडी उमेदवारांना 118 रुपये महिला उमेदवारांना काही प्रमाणामध्ये सवलत मिळणार आहे.

निवड प्रक्रिया कशी असणार

सर्वात प्रथम उमेदवारांना ऑनलाइन परीक्षा द्यावी लागणार आहे यामध्ये यशस्वी झालेल्यांना मुलाखत फेरीसाठी बोलवलं जाईल. शेवटी दोन्ही टप्प्यातील गुणांवर आधारित फायनल सिलेक्शन होणार आहे.

पगार किती मिळेल ?

या भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना स्केल II आणि स्केल III पदांसाठी तब्बल 93 हजार 690 रुपये मासिक पगार मिळणार आहे. याशिवाय इतर भत्ते सुविधा वेगळे असतील. म्हणजे एकूण पॅकेज चांगलंच आकर्षक असणार आहे.

अर्ज कसा करायचा?

इच्छुक उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून अर्ज करायचा आहे. लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक वेबसाईट ओपन होईल तिथे दिलेली आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरायचे आहे अर्ज शुल्क करून ऑनलाईन फॉर्म सबमिट करायचा आहे शेवटी प्रिंट काढून ठेवा.

हे पण वाचा | स्टेट बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; बँकेने जाहीर केली मोठी बंपर भरती लगेच अर्ज करा

Leave a Comment

error: Content is protected !!