Beneficiary Status: देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार अंतर्गत चालवली जाणाऱ्या लोकप्रिय प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी 2000 रुपये जमा केले जात आहेत. देशातील सुमारे 9.7 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचा लाभ वितरित करण्यात आला आहे. यासाठी सरकारने वीस हजार पाचशे कोटीचा निधी जारी केला आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 19 हप्ते जमा झाले होते. यानंतर आज विसावा हप्ता वितरित करण्यात आला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यात आले आहेत. जर तुम्हाला अजूनही पैसे मिळाले आहेत का नाही याबद्दल शंका निर्माण होत असेल तर तुम्ही खालील पद्धतीने तुमच्या खात्यात या योजनेचा हप्ता आला आहे का नाही तपासू शकता.
तुमच्या खात्यात पैसे आले का नाही असे तपासा? (Beneficiary Status)
- सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर (https://pmkisan.gov.in) जा.
- त्यानंतर तुम्हाला बेनिफेसरी स्टेटस (beneficiary status) असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- या ठिकाणी तुमचा बँक खात्याशी लिंक असलेला आधार नंबर टाकावे लागेल.
- विचारलेली सर्व माहिती भरल्यानंतर गेट डाटा या बटणावर क्लिक करा.
- यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यात 20व्या हप्त्याचे 2000 जमा झाले आहेत का नाही याचे स्टेटस दिसेल.
हे पण वाचा| आनंदाची बातमी! LPG गॅस सिलिंडर झाला स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर..
याशिवाय तुम्ही बँकेत जाऊन देखील तुमच्या खात्यात पैसे जमा झाले का नाही तपासू शकता. जर तुमच्या बँक खात्याला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर तुम्हाला मेसेज मिळेल. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या बँकेच्या अधिकृत ॲपवर लॉगिन करून ट्रांजेक्शन हिस्टरी तपासू शकता. येथे तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला आहे का नाही दिसेल. जर तुम्ही ऑनलाईन व्यवहार करत नसाल तर तुम्ही तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन पासबुक मध्ये एन्ट्री करून किंवा बॅलन्स तपासून खात्री करून घेऊ शकता.
ही योजना शेतकऱ्यांसाठी नेहमीच आर्थिक आधार देणारी ठरली आहे. सध्या शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी खत, औषधे खरेदी करण्यासाठी पैशाची गरज भासत आहे. अशात शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत मिळणारा आर्थिक फायदा मोलाचा ठरत आहे. 20व्या हप्त्याच्या 2000 रुपयातून शेतकरी त्यांच्या पिकांसाठी बी, खते आणि औषधे खरेदी करू शकतात. त्यामुळे तुमच्या खात्यात पैसे आले आहे का नाही तुम्ही हे लगेच तपासा आणि या योजनेचा लाभ घ्या. Beneficiary Status
टीप: जर तुम्हाला पैसे जमा झाल्याचा मेसेज आला नसेल किंवा ऑनलाईन स्टेटस मध्ये पैसे जमा झाल्याचे दिसत नसतील तर काही तांत्रिक अडचणीमुळे पैसा जमा होण्यास विलंब होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता काही काळ प्रतीक्षा करून पुन्हा एकदा आपले स्टेटस तपासावे.
1 thought on “9.7 कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे ₹2,000 खात्यात जमा; तुम्हाला मिळाले का नाही असं चेक करा”