PM Kisan : महाराष्ट्रातील अडीच लाख शेतकऱ्यांना मोठा धक्का! 21 व्या हप्त्यातून नाव वगळलं, 2000 रुपये मिळणार का? यादीत नाव कसं तपासायचं ते जाणून घ्या…

PM Kisan | शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची पीएम किसान सन्मान निधी योजना म्हणजे एक प्रकारे आधारस्तंभच. छोट्या शेतकऱ्यांसाठी तर दर चार महिन्यांनी मिळणारे 2000 रुपये म्हणजे खत-बियाणे खरेदी असो किंवा घरातील किरकोळ खर्च, एक मोठा हातभार असतो. अशात 19 नोव्हेंबरला 21 व्या हप्त्याचे पैसे देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचं कळतं आणि सगळ्या गावी याचीच चर्चा सुरू होते “हप्ता कधी येणार? माझं नाव आहे की नाही?” पण त्याच वेळी महाराष्ट्रासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील जवळपास अडीच लाख शेतकऱ्यांची नावं यादीतून वगळण्यात आलीत, आणि हे ऐकल्यावर अनेक शेतकरी चिंतेत पडले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती, प्राप्तिकर, शिधापत्रिका, आधार लिंकिंग या सगळ्या बाबींची तपासणी सुरू होती. जे शेतकरी योजनेच्या निकषात बसत नाहीत, अशांच्या नावावर लाल निशाण झालं. याच तपासणीत महाराष्ट्रातील अडीच लाख शेतकरी अपात्र ठरले असल्याची माहिती समोर आली. गावागावातील शेतकऱ्यांना आता एकच प्रश्माझं नाव अजून आहे का? मला 2000 येणार का? PM Kisan

योजनेच्या 21 व्या हप्त्याचा मोठा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. देशभरातील शेतकऱ्यांना मिळून तब्बल 18,000 कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातील 90 लाख 41 हजार शेतकऱ्यांना या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. पण अडीच लाख शेतकऱ्यांना वगळल्यामुळे काही गावांत लोकांमध्ये संभ्रम आहे.

का वगळली नावं?

शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे की असं अचानक का? केंद्र सरकारच्या माहितीनुसार आधार कार्ड आणि शिधापत्रिका तपासणी, प्राप्तिकर रिटर्न, कुटुंबाचं एकूण उत्पन्न, जमीन नोंदीतील गोंधळ, चुकीची माहिती दिलेली कागदपत्रं,या सगळ्याच्या आधारे नावं कमी करण्यात आली आहेत. गावात तर लोक म्हणतात, काय माहित, ऑफिसात डेटा चुकला असेल, नाव गेलं नसेल ना? त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपलं नाव यादीत तपासणं गरजेचं आहे.

21 वा हप्ता नेमका कधी?

19 नोव्हेंबर 2025 रोजी हप्ता जमा होणार. पंजाब, उत्तराखंड, हिमाचल आणि जम्मू–कश्मीर या राज्यांना पूरस्थितीमुळे आधीच हप्ता देण्यात आला. महाराष्ट्रासह उर्वरित राज्यांना 19 नोव्हेंबरला रक्कम मिळेल. मागील 20 वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 ला मिळाला होता. योजना सुरू झाली तेव्हा पहिला हप्ता 24 फेब्रुवारी 2019 ला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला होता आणि तेव्हापासून दर चार महिन्यांनी 2000 ची मदत सुरू आहे.

तुझं नाव यादीत आहे का? अशा प्रकारे तपासा

बर्‍याच शेतकऱ्यांना वेबसाइट उघडणं, पर्याय निवडणं यात अडचण येते. म्हणून अगदी सोप्या भाषेत सांगतो भाऊ PM Kisan ची अधिकृत साइट उघडा pmkisan.gov.in

(तुझ्याकडे ब्राउझर नसेल तर जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये (CSC) किंवा मित्रांच्या मोबाइलवर बघू शकतोस.)

‘Beneficiary List’ किंवा ‘लाभार्थी यादी’ पर्याय निवडा. राज्य, महाराष्ट्र निवडा तुझा जिल्हा निवडा. तालुका निवडा, गावाच्या यादीतून तुझं गाव निवडा आणि ‘Get Report’ वर क्लिक करा. स्स!, आता संपूर्ण गावाची यादी उघडेल. या यादीत तुझं नाव आहे का ते पाहा. नाव नसल्यास, पुढील हप्त्यापूर्वी नोंदणी दुरुस्त करावी लागेल.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्वाची योजना नमो शेतकरी महासन्मान केंद्राच्या पीएम किसान व्यतिरिक्त राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दरवर्षी 2000 रुपये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून दिले जातात. शेतकरी या योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार याच्या प्रतीक्षेत आहेत. राज्य शासनाचं कामकाज पूर्ण झाल्यावर पुढील घोषणा होण्याची शक्यता आहे.

(disclaimer : वरील दिलेली माहिती प्रसार माध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही)

Leave a Comment

error: Content is protected !!