Bullet Train News : जम्मू-काश्मीरसाठी एक मोठी आणि उत्साहवर्धक बातमी समोर आली आहे आणि गेल्या काही दिवसांपासून कटरा–अमृतसर वंदे भारत तात्पुरती स्थगित ठेवली गेल्यानं जे प्रवासी अडचणीत होते, त्यांच्यासाठी आता सरकारकडून एक नवीनच दिलासा मिळालाय. जम्मू–अमृतसर दरम्यान थेट बुलेट ट्रेनचा मार्ग तयार करण्याचं मोठं काम वेगात सुरू होणार असल्याची माहिती बाहेर आली आणि उत्तर भारतात यानंतर जे चित्र निर्माण होणार आहे ते पूर्णपणे बदलून टाकणारं ठरेल असं स्पष्ट दिसतंय. मुंबई, अहमदाबाद बुलेट ट्रेनची चर्चा मागील काही महिन्यांपासून गाजत असताना आता जम्मू–काश्मीरलाही अशाच उच्च गतीच्या प्रवासाची भेट मिळणार आहे, हीच गोष्ट लोकांना सर्वाधिक आनंद देणारी ठरत आहे. Bullet Train News
गेल्या काही वर्षांत कटरा अमृतसर दरम्यान वंदे भारतने उत्तम सेवा दिली पण अचानक मार्च 2026 पर्यंत ती स्थगित झाली तेव्हा प्रवाशांची कनेक्टिव्हिटी तुटल्यासारखी झाली. विशेषतः ती गाडी रोज वापरणाऱ्या लोकांसाठी ही मोठी समस्या बनली. अशा वेळीच बुलेट ट्रेनचा पर्याय निर्माण होतोय, ही बातमी येताच जम्मू आणि पंजाबमधील जनतेमध्ये एक वेगळाच उत्साह दिसू लागलाय. कारण या मार्गावर बुलेट ट्रेन धावू लागली तर प्रवासाचा वेळ निम्म्यावर येणार आणि दोन मोठ्या राज्यांमध्ये दळणवळणाची गती अक्षरशः बदलणार आहे.
सरकारने या प्रकल्पाचा अंतिम अलाईनमेंट डिझाइन सुरू करण्यासाठी NHSRCL मार्फत निविदा मागवल्या आहेत म्हणजे प्रकल्प आता कागदावरून प्रत्यक्ष कामाकडे जाणार आहे. दिल्ली–अमृतसर–कटारा हाय-स्पीड कॉरिडॉरचा हा उत्तरेकडचा विस्तार मानला जात असल्याने हा मार्ग पंतप्रधान मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक समजला जातोय. निविदा प्रक्रिया पूर्ण होताच अलाईनमेंटचे काम सुरू होणार आणि त्यानंतर संपूर्ण अभियांत्रिकी, तांत्रिक तपशील, बांधकामाचा आराखडा हे सगळं टप्प्याटप्प्याने पुढे जाणार आहे.
अंदाजे 75 कोटींपेक्षा अधिक खर्च असलेल्या या 240 किलोमीटरच्या हाय-स्पीड मार्गामुळे अमृतसर–जम्मू दरम्यानचा प्रवास कितीतरी वेगवान होणार आहे. आज जे अंतर आणि वेळ लोकांना थकवून टाकतं, तेच अंतर बुलेट ट्रेनमुळे काही मिनिटांत संपणार आहे. विशेष म्हणजे जम्मू-काश्मीरसारख्या पर्यटनप्रधान राज्याला या प्रकल्पामुळे मोठी आर्थिक चालना मिळेल, असा तज्ञांचा अंदाज आहे. यात्रेकरू, पर्यटक, पर्यटनाशी जोडलेले व्यवसायिक सर्वांसाठीच ही हाय-स्पीड ट्रेन नवा आधार ठरणार आहे.
पंजाबलाही याचा थेट फायदा मिळणार आहे कारण या प्रदेशातील व्यापार, उद्योग आणि गुंतवणूक यांना उत्तर भारतातील जलद कनेक्टिव्हिटीमुळे नवीन दिशा मिळेल. पुढील काही वर्षांत उत्तर भारताच्या संपूर्ण वाहतूक व्यवस्थेत ही ट्रेन गेमचेंजर ठरेल याबाबत कुणालाच शंका नाही. प्रवास जलद, आधुनिक, सुरक्षित आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असणार आहे आणि त्यामुळे लोकांच्या दैनंदिन जीवनातही मोठा फरक पडणार आहे.
(Disclaimer: वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे)
हे पण वाचा | भारतातील असे दहा रेल्वे स्थानक ज्यांचं नाव घेताना लाज वाटते; ही विचित्र नाव ऐकून तुम्हीही हसायला लागल
