Business Ideas: वाढत्या महागाईमुळे महिन्याच्या पगारातून घर खर्च, विज बिल, मुलांची फी, औषधे हे सगळं भागवणे शक्य होत नाही. त्यामुळे नोकरीसोबतच एखादा साईड बिजनेस किंवा छोटासा व्यवसाय सुरू करून अतिरिक्त पैसे कसे कमवता येतील? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. वाढत्या महागाईमुळे नोकरी करून घर चालवणे अशक्य होत चालला आहे. पण आता काळ बदलला आहे कुणी ऑनलाइन काम करत आहे तर कोणी घरातून छोटा व्यवसाय सुरू करत आहे. तुम्ही देखील तुमचा रिकामा वेळ वापरून चांगली कमाई करू शकता. चला तर मग जाणून घेऊया घरबसल्या किंवा थोडीशी मेहनत घेऊन कशी कमाई करता येईल?
ऑनलाइन कमाई करण्याचे मार्ग
- फ्रीलायन्सिंग:– लिहिणं डिझाईन फोटो व्हिडिओ एडिटिंग डेटा एन्ट्री मार्केटिंग अशा अनेक प्रकारच्या सेवा Upwork, Fiverr किंवा Freelancer.com वर देऊन तुम्ही चांगली कमाई करू शकता.
- AI टूल्सचा वापर:– Canva, ChatGPT, Mid journey यासारख्या टूल्सचा वापर करून ई-बुक, डिझाईन, मार्केटिंग, कंटेंट तयार करा आणि त्याची विक्री करा. यातून देखील तुम्ही चांगली कमाई करू शकता.
- पेड सर्व्हे भरणे:– Swagbucks, Survey Junkie यासारख्या साईटवर साधे सर्व्हे तयार करून चांगली कमाई करू शकतात.
- ब्लॉग किंवा युट्युब चॅनेल:– तुम्हाला आवडीच्या विषयावर किंवा माहितीच्या विषयावर चांगला ब्लॉग लिहा आणि त्याचा व्हिडिओ बनवा आणि Google AdSense द्वारे जाहिरातीतून उत्पन्न मिळवा.
- ऑनलाइन फोटोग्राफी विकणे:– Fine art America ,smugmug यावर तुमचे फोटो अपलोड करून विक्री करा.
- ऑनलाइन कोर्सेस विकणे:– ज्याविषयी तुम्हाला पूर्ण माहिती आहे त्या विषयाच्या व्हिडिओ कोर्स तयार करून Udemy किंवा Gumroad वर विक्री करा. यातून देखील तुम्हाला चांगली कमाई मिळू शकते.
हे पण वाचा| लाडक्या लेकीसाठी सरकारकडून थेट 1 लाख रुपयांची भेट! जाणून घ्या काय आहे सरकारची योजना
ऑफलाइन कमाईचे मार्ग
- 1.उबर ड्रायव्हिंग:–रिकाम्या वेळेत टॅक्सी ड्रायव्हिंग करून चांगली कमाई करता येईल.
- 2.हाऊस सीटिंग:– मालक बाहेर गेल्यानंतर घर व पाळीव प्राण्यांची काळजी घेणे.
- 3. घरगुती कॅटरिंग:– स्वयंपाकाची आवड असेल तर लहान कार्यक्रमासाठी जेवण पुरवण्याचे काम करून चांगले पैसे कमवू शकता.
- 4. हस्तकला वर्कशॉप: –गावात किंवा शहरात छोट्या छोट्या वर्कशॉप घेऊन उत्पन्न मिळवू शकता.
- 5.शेती उत्पादन विक्री:– घरच्या अंगणात उगवलेली भाजी फळ विकून चांगले उत्पन्न मिळू शकतात.
- 6.खाजगी शिकवण: – तुम्हाला माहिती असलेल्या विषयाबद्दल विद्यार्थ्यांना शिकवून चांगले पैसे मिळू शकतात. Business Ideas
1 thought on “Business Ideas: घरबसल्या पैसे कसे कमवायचे? जाणून घ्या ‘हे’ खास ऑनलाइन आणि ऑफलाइन मार्ग”