Car Video Viral | पावसाळा आला की गावकुसापासून ते शहरापर्यंत सगळीकडे एकच चर्चा सुरू होते खड्डे, ढासळलेले रस्ते आणि त्यातून होणारे अपघात. आधीच मुसळधार पाऊस आणि त्यात जर कार, बाईक घेऊन बाहेर पडायचं ठरवलं तर मनात धाकधूक कायम. पण, सोशल मीडियावर फिरत असलेला एक थरारक Road Collapse Car Accident Viral Video पाहिला की खरंच अंगावर काटा येतो. Car Video Viral
कल्पना करा बरं तुम्ही तुमची गाडी रस्त्याच्या कडेला अगदी निवांत उभी केली आणि अचानक डोळ्यांसमोर ती कार जमिनीत गडप झाली तर? होय, असंच काहीसं एका ठिकाणी घडलंय आणि त्या काही सेकंदांचा व्हिडीओ पाहिला की माणूस सुन्न होऊन जातो.
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
नेमकं काय घडलं?
व्हिडीओमध्ये दिसतंय की रस्त्याच्या कडेला कार अगदी नीट पार्क केलेली आहे. कुठे धोक्याची चिन्हं नाहीत, लोकही निवांत उभे आहेत. पण काही सेकंदांत कारचा मागचा भाग हळूहळू खाली दाबला जाऊ लागतो. आधी वाटतंय की कार थोडी हलली असेल, पण बघता बघता संपूर्ण रस्ता कोसळतो आणि कार पूर्णपणे जमिनीत शिरते.
पाहणाऱ्यांसाठी तो क्षण एखाद्या हॉलिवूडच्या थरारपटापेक्षा कमी नव्हता. जिथे गाडी उभी होती तिथली माती सततच्या पावसामुळे कमजोर झाली होती. जमिनीला कारचं वजन सहन झालं नाही आणि ती गडप झाली.
हा VIDEO कुठून आहे?
नेटकऱ्यांच्या चर्चेनुसार हा प्रकार भारतातीलच एखाद्या शहरात घडलेला असावा. कारण आजूबाजूचं वातावरण, बांधकामाचा पद्धती यावरून तसं दिसतंय. मात्र नेमकं ठिकाण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण यामुळे चर्चेचं वादळ उठलंय नगरपालिकेचं निष्काळजीपणं, रस्त्यांची हलाखी, पावसाळ्यातली दुरवस्था सगळं लोक सोशल मीडियावर बोलताहेत.
हे पण वाचा | एवढीशी पोरगी काय नाचली….! व्हिडिओ पाहून तुम्ही करताल कौतुक सोशल मीडियावरती व्हिडिओ होते तुफान व्हायरल