Central Railway Bharti 2025: मध्य रेल्वेत 2,418 पदासाठी मेगाभरती! नोकरी करण्याची सुवर्णसंधी, अर्जप्रक्रिया सुरू..


Central Railway Bharti 2025: महाराष्ट्र राज्यातील युवकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. तुम्हाला देखील महाराष्ट्रामध्ये नोकरी करायची असेल तर आता रेल्वेत करिअर करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी रेल्वेमध्ये करिअर तयार करण्याची संधी निर्माण झाली आहे. मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत 2418 शिकवू उमेदवार पदासाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. ही भरती ऑगस्ट 2025 मध्ये सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 सप्टेंबर 2025 आहे. ज्या उमेदवारांना रेल्वेत नोकरी करण्याची ही संधी मिळवायचे आहे त्यांनी या तारखेच्या आत ऑनलाईन अर्ज सादर करावा. या भरतीमुळे राज्यातील लाखो तरुणांना त्यांचं करियर घडवण्याची संधी मिळणार आहे. खास करून भुसावळ पुणे नागपूर आणि सोलापूर विभागात काम करण्याची या भरतीतून उत्तम संधी निर्माण झाली आहे.

अर्ज करण्याची पात्रता

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून काही शैक्षणिक अटी घालण्यात आल्या आहेत.

  • अर्ज करणारा उमेदवार दहावी पास असावा.
  • त्याचबरोबर ITI उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्ष दरम्यान असावे.
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी सवलत आहे. यामध्ये SC/ST उमेदवारांना 5 वर्षे सवलत मिळते तर OBC उमेदवारांना 3 वर्षाची सवलत दिली जाते.

हे पण वाचा| SBI मध्ये मेगा भरती! लगेच अर्ज करा, सरकारी नोकरी करण्याची हीच सुवर्ण संधी..

निवड प्रक्रिया कशी होणार?

या भरतीसाठी कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही निवड प्रक्रिया दहावी आणि ITI मध्ये मिळालेल्या गुणाच्या आधारावर केली जाणार आहे. म्हणजेच तुमचं शिक्षण एक गुणपत्रक तुमच्या निवडीचे मुख्य शस्त्र आहे. यामध्ये शिकवू उमेदवारांना कामाच्या बदल्यात दरमहा सात हजार रुपये स्टायपेंड दिला जाईल. प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना रेल्वेत काम करण्याचा अनुभव मिळेल जो भविष्यात स्थिर नोकरी मिळवण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. Central Railway Bharti 2025

अर्ज कसा करावा?

  • इच्छुक उमेदवारांनी मध्य रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे.
  • अर्ज करताना सर्व कागदपत्राची अपलोड केलेली सर्व प्रत सोबत ठेवणे आवश्यक आहे.
  • अर्जाची अंतिम तारीख 11 सप्टेंबर 2025 आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या क्षणापर्यंत वाट न पाहता लगेच आपला अर्ज सादर करावा.

तरुणांसाठी मोठी संधी

आज अनेक तरुण शिक्षण पूर्ण करून बेरोजगार आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा असल्यामुळे नोकरी मिळणे कठीण जात आहे. अशा परिस्थितीत रेल्वे सारख्या सुरक्षित आणि प्रतिष्ठित क्षेत्रात नोकरीची ही सुवर्णसंधी मिळणे खरंच मोठ्या भाग्याचे ठरेल. भुसावळ पुणे नागपूर आणि सोलापूर या विभागात उमेदवारांना नोकरी करण्याची संधी मिळणार असल्याने या जिल्ह्यातील युवकांमध्ये विशेष उत्साह निर्माण झाला आहे. अनेक तरुणांना आपल्या घराजवळच काम मिळणार असल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना देखील मोठा दिलासा मिळत आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “Central Railway Bharti 2025: मध्य रेल्वेत 2,418 पदासाठी मेगाभरती! नोकरी करण्याची सुवर्णसंधी, अर्जप्रक्रिया सुरू..”

Leave a Comment

error: Content is protected !!