Chanakya Niti | आर्य चाणक्य… एक असे व्यक्तिमत्व ज्यांनी हजारो वर्षांपूर्वीही समाजाला मार्गदर्शन करणारे विचार लिहून ठेवले. चाणक्य नीती नावाच्या त्यांच्या अमूल्य ग्रंथामध्ये आयुष्य कसं जगावं, कोणत्या चुका टाळाव्यात आणि कोणत्या गोष्टी पाळाव्यात याविषयी त्यांनी अत्यंत सखोल मार्गदर्शन केलं आहे. या ग्रंथात त्यांनी महिलांच्या शक्तीबद्दलही स्पष्टपणे आणि प्रामाणिकपणे लिहिलं आहे. विशेष म्हणजे चाणक्य म्हणतात की काही बाबतीत पुरुष महिलांपुढे कधीच टिकू शकत नाहीत! Chanakya Niti
आता यामागचा नेमका अर्थ काय? कोणत्या गोष्टीत महिलांचा हात पुरुषांपेक्षा वरचा आहे, हे समजून घेऊया चाणक्यांच्या शब्दांतून.
धैर्य – प्रतिकूल काळातही शांत राहण्याची ताकद
चाणक्य स्पष्टपणे सांगतात की महिला या भावनिकदृष्ट्या अतिशय मजबूत असतात. संकटं आली की पुरुषांनी घाबरायचं, तर महिलांनी त्या संकटाला छातीवर घ्यायचं, हा अनेकदा दिसून आलेला अनुभव आहे. आई, बहिण, पत्नी, मुलगी कोणत्याही रूपात त्या संकटांना सामोरं जाण्याचं अफाट धैर्य बाळगतात.
चातुर्य – प्रसंगावधान आणि डावपेच
चाणक्यांच्या मते, चातुर्य हा महिलांमध्ये जन्मजात गुण असतो. एखादी कठीण परिस्थिती असो किंवा संकट महिला सहजगत्या आपल्या अक्कल आणि समजूतदारपणाने मार्ग काढतात. एखाद्या गोंधळलेल्या प्रसंगातही त्यांचं भान न जातं ही त्यांच्या मनाच्या ताकदीची निशाणी आहे.
समजूतदारपणा – नात्यांना सांधणारी उब
आर्य चाणक्य म्हणतात, समजूतदारपणात महिलांचा तोलमोल वाखाणण्याजोगा असतो. नात्यात वाद झाला तरी महिलाच पहिल्या असतात ज्यांनी त्या वादात तोडगाही काढला आणि पुन्हा घरात शांतता प्रस्थापित केली. पती-पत्नीचा वाद असो वा सासरच्या समस्या, महिलांचं संयमित वर्तन कुटुंबाचं सौख्य राखून ठेवतं.
कुटुंबाला एकत्र ठेवण्याची ताकद
चाणक्यांचे विचार स्पष्ट आहेत पुरुष कुटुंबाचा आधार असतो, पण महिलाच त्याला एकत्र ठेवतात. जिथं बहीण, आई, पत्नी किंवा सासू नात्यांमध्ये प्रेम, संयम आणि समज आहे, तिथं कुटुंब अखंड राहतं. महिलांची ही एकत्रित ठेवणारी शक्ती पुरुषांना साधता येत नाही.
निर्णय क्षमता – योग्य वेळी योग्य पाऊल
अनेकदा पुरुष मोठ्या निर्णयांपुढे गोंधळतात, पण चाणक्य सांगतात की महिलांमध्ये वेळीच निर्णय घेण्याची विलक्षण क्षमता असते. त्या भावनांपेक्षा वास्तव पाहून निर्णय घेतात आणि अनेकदा कुटुंबाचा किंवा स्वतःच्या आयुष्याचा निर्णायक टप्पा त्या यशस्वीपणे पार करतात.
(Disclaimer: वरील माहिती उपलब्ध माहिती स्त्रोतांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठला दावा करत नाही)