Compensation For Damages: शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते. शेती म्हणजे भाऊ सोपी गोष्ट नाही आपल्याला दिसते तेवढे सोपं नसतं. शेतकरी बांधव त्यांचे सर्व कष्ट या काळ्या मातीच्या पोटामध्ये टाकतात. परंतु या कष्टाला फळ मिळेल का नाही हे त्यांना देखील माहित नसतं. शेतकऱ्यांना शेती करताना अनेक संकटे असतात, अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती अशीच काही परिस्थिती गेल्या वर्षी सप्टेंबर ऑक्टोबर 2024 मध्ये आली होती. आणि यंदाच्या जून 2025 मधील मुसळधार पावसामुळे मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील हजार शेतकऱ्यांची शेतीची नुकसान झाली आहे. पिक वाहून गेली, जमीन पाण्याखाली गेली, काही ठिकाणी मातीचा थर सचिन जमीन वांज झाली. अशा संकटामध्ये राज्य सरकारने शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी 368 कोटी 86 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. Compensation For Damages
जिल्हानिहाय मंजूर मदत (जून 2025 आपत्ती)
- छ. संभाजीनगर – 171 शेतकरी, 72 हेक्टर नुकसान -16.01 लाख
- हिंगोली – 3,247 शेतकरी, 1,611 हेक्टर – 360.45 लाख
- नांदेड – 7,498 शेतकरी, 4,790 हेक्टर – 1,076.19 लाख
- बीड – 103 शेतकरी – 1.99 लाख
- अकोला – 6,136 शेतकरी, 3,790 हेक्टर – 405.90 लाख
- यवतमाळ – 186 शेतकरी 25.45 लाख
- बुलढाणा – 90,383 शेतकरी – 7,445.03 लाख
- वाशिम – 8,527 शेतकरी 471.21 लाख
हे पण वाचा| हवामान खात्याचा मोठा इशारा; पुढील 24 तासात या जिल्ह्यात होणार तुफान पाऊस
सप्टेंबर ऑक्टोबर 2024 आपत्ती मदत
धाराशिव तब्बल 3,27,939 शेतकरी, 1,89,610 हेक्टर 26,143.38 लाख, छत्रपती संभाजीनगर 7,548 शेतकरी, – 6,65.41 लाख धुळे – 1 शेतकरी – 0.04 लाख Compensation For Damages
पूर आणि पावसानंतर लगेच जिल्हाधिकाऱ्यांनी याचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले होते जिल्हा प्रशासनाने अहवाल सरकारकडे सादर करताच ही मदत तातडीने शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेली आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये एकट सोडणार नाही आम्ही त्यांना आर्थिक हातभार आम्ही लावणार आहोत. यामुळे शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा मिळाला आहे तसेच शेतकऱ्यांना पुन्हा दिलासा देण्यासाठी शासनाचा हा एक निर्णय खूप महत्त्वाचा ठरणार आहे.